भव्या फाउंडेशन, जयपूर (राजस्थान) यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड – २०२६’ यंदा प्रा. शेख मोईन शेख नईम यांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी दिली.

आगामी ५ एप्रिल २०२६ रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्यास देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

प्रा. शेख मोईन शेख नईम यांनी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेले संशोधनकार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम आणि समाजाभिमुख कार्य यामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.