भव्य फाउंडेशन, जयपूर यांच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनात प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांची ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे.

फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी ही माहिती दिली. हा भव्य सोहळा ५ एप्रिल रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात येणार असून, देशभरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

प्रा. रोशन मावळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधन कार्यात दिलेले योगदान आणि सामाजिक कल्याणासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडून आले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.