मुंबई | वृत्तसंस्था

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर वाढत्या दबावामुळे अखेर त्यांना पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे संकेत दिल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.

सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणा पुरावे गोळा करत आहेत. अशोक खरात प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या घटनांमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या वाढत्या प्रभावावर कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.