प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करावी :- नरेंद्र इंगळे
दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार : दिनांक : २५ मार्च २०२६
सम्राट अशोक (जन्मः इ.स.पू. ३०४ सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यत आपल्या राज्याचा विस्तार केला. अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’ असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. मृत्यू इ.स.पू. २३२) हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे महत्व:
१) भारताच्या राष्ट्रध्वजात वापरले जाणारे अशोकचक्र
२) भारतीय चलनी नोटा, नाणे, सरकारी दस्तऐवज यावर वापरला जाणारा अशोकस्तंभ
३) देशाचा सर्वोच्य भारतरत्न पुरस्कार यावर वापरले जाणारे अशोकचक्र आणि अशोकस्तंभ
४) सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून सैनिकांना दिला जाणारा अशोक चक्र पुरस्कार
अशोकचक्र, अशोकस्तंभ, सम्राट अशोकाची हि प्रतीके केवळ आज सम्राट अशोक यांच्या पुरती सीमित न राहता आज ती भारत देशाची सन्मानाची व देशाचा अभिमान वाढवणारी राष्ट्रीय प्रतीके झाली आहेत. परंतु आपण फक्त सम्राट अशोक यांनी दिलेली राष्ट्रीय प्रतीके अभिमानाने मिरवतो ज्यांच्यामुळे भारताला हि सर्वोच्य देणं मिळाली आहे त्यांना मात्र आपण दुर्लक्षित करत आहोत. त्यामुळे सम्राट अशोक यांच्या कार्याला व इतिहासाला पुन्हा एकदा नव्याने उजाळा देण्यासाठी या राष्ट्रपुरुषाची चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती करणे गरजेचे असून त्यात आपले मोलाचे योगदान लाभावे.दिनांकः २६/०३/२०२६ रोजी मार्च महिन्यात सम्राट अशोक यांची जयंती येत आहे. सर्वांनी विविध कार्यक्रम राबवून जयंती साजरी करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांनी दिले.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार : दिनांक : २५ मार्च २०२६

