दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : २७ मार्च २०२६

नागपूर , (प्रतनिधी : रमेश लांजेवार):-
“सन्माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना पत्र”
दिनांक:- २३ मार्च २०२६.
प्रति, सन्माननीय देवेन्द्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
विषय:- महापालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य पद पत्रकारांना सुध्दा मिळावे
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
महापालिका,नगरपालिकेप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमले जाणार आहेत.या संदर्भातील महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा ) विधेयक मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ ला विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले याचे मनापासून स्वागत. कारण हे सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून सरकारने उचलेले अत्यंत महत्वाचे आणि योग्य पाऊल आहे याची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमी आहे.सामाजिक कार्य करणारे अनेक क्षेत्रातील निष्ठावंत, विचारवंत, सामाजिक बांधिलकी व समाजासाठी झटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवक सुद्धा असतात आणि आहेत त्यांचे कार्य अफाट असते परंतु दिसत नाही,ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.यात प्रामुख्याने पत्रकार, लेखक, साहित्यिक, डॉक्टर,वकिल, कलाकार,स्वतंत्र पत्रकार,सीए, निवृत्त शिक्षक, विचारवंत, पर्यावरण प्रेमी,निवृत्त अग्निशमन अधिकारी, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी, पर्यावरण प्रेमी इत्यादी अशा अनेक प्रकारच्या सतत सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्यांचा स्वीकृत सदस्यांमध्ये समावेश होने अत्यंत गरजेचे आहे.याच अनुषंगाने देशाचा “चौथास्तंभ”असलेला पत्रकार यांची सामाजिक कार्याची जाणीव लक्षात घेऊन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पुढील दृष्टिकोनातून विकासाची वाटचाल प्रबळ व्हावी व समाजाला योग्य न्याय मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रात पत्रकारांना स्वीकृत सदस्य पदाचा मान मिळायलाच हवा.कारण पत्रकारांचे कार्य ग्रामीण,शहर, जिल्हा,राज्य,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात असते याचा फायदा महानगरपालिका,नगरपालिका, जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो ही बाब नाकारता येत नाही.कारण याबाबतचा पत्रकारांना सखोल अभ्यास व दांडगा अनुभव असतो याचा फायदा राज्याच्या ग्रामीण आणि शहराच्या विकासामध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अवश्य होईल असा मला दृढ विश्वास आहे. ज्याप्रमाणे सरकारने स्वीकृत सदस्य पदाचे विधेयक एकमताने मंजूर केले त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात पत्रकारांना स्वीकृत सदस्य पदाचा मान मिळावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय आपण अवश्य पाऊल उचलावेत अशी या पत्राद्वारे विनंती करण्यात येत आहे.असे जर झाले तर राज्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल व चौथ्यास्तंभाचा सन्मान उंचावेल.यावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण अवश्य गांभीर्याने विचार कराल व पत्रकारांना राज्यात स्वीकृत सदस्य पदाचा बहुमान देऊन राज्याला गौरवान्वित कराल.आपण माझ्या या विनंती पुर्वक पत्राचा अवश्य विचार कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद! जय महाराष्ट्र.
लेखक :
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार / लेखक )
६३ बी, शिवनगर, नागपूर -९.
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
mail id:- lanjewar767@gmail.com

