दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : २७ मार्च २०२६

स्वदेश फाऊंडेशन वतीने स्वप्नातील निरवा रानविहिरगाव विकास कामाचा जल्लोषात शुभारंभ
सुरगाणा ,(प्रतिनिधी : रतन चौधरी):-तालुक्यातील खुंटविहीर ग्रामपंचायत अंतर्गत निरवा रानविहिर गाव विकास समितीच्या वतीने लोक सहभागातून गाव मूल्यांकन प्रक्रिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यातील एकशे एक्याण्णव महसुली गावांपैकी रानविहिर सह अठ्ठावन्न गावाने एकत्रित येत तालुक्यात विकास व स्वच्छतेची कास धरीत एक वेगळा आदर्श निर्माण करीत गावाचा विकास साध्य करायचा ठाम निर्धार केला आहे.मागील तीन महिन्यापासून या गावात आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती,बालविवाह प्रतिबंध,महिला बचतगट,दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. यात स्वदेस फाउंडेशन यांच्या मार्गदर्शना खाली हे गाव उत्तुंग भरारी घेत आहे. रानविहिर या गावात एकूण सत्तर ते पंच्याहत्तर घरांची लोकवस्ती आहे. या सर्व घरांना एकच रंग फिकट पिवळा रंग दिला आहे.सर्व घरांमध्ये शोषखडे खोदून पूर्ण झाले आहे.गावात बाबींचे कुंपण तयार करून रंगरंगोटी करीत सुशोभीकरण करुन गावाच्या प्रवेशद्वार व गावाच्या मध्यभागी आकर्षक व असे पारंपरिक लोकसंस्कृतीचे देखावे सेल्फी पांईट म्हणून उभारण्यात आले आहेत. भिंतीवर सुविचार व घोषवाक्ये लिहून बोलक्या भीती बनवल्या आहेत.गावाच्या प्रवेश द्वार जवळ सुंदर अशी कमान बनवली आहे.विशेष गावाने पुढाकार घेऊन गावातील दारु, बंद केली असून गाव व्यसन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. स्वदेस फाउंडेशन संस्थेने या गावात चांगली कामे करण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमात सरपंच आनंदा झिरवाळ, शिक्षक रतन चौधरी, पांडुरंग वाघमारे,भास्कर अलबाड यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक निलेश पाटील,विलास खाडे स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक रायगड विभागीय व्यवस्थापक राजेंद्र गुंड , तालुका उप व्यवस्थापक दिपक मोरे, मयुर, रानविहिर गाव समन्वयक नितीन राऊत, देवराम गावित, काशिनाथ वार्डे, बन्सी गावित, मनू भोये, अनद पवार, कांतीराम चौधरी, अशोक खिराडी, सोनीराम गांगोडे, निमतारा राऊत, कांचन गावित, कला गावित, लहानू गावित, बशीराम भोये, रेखा गावित, मंजूळा खिराडी, भारती गावित, कमळा गावित, प्रमिला चौधरी, भारती गावित, प्रकाश खिराडी, कमलेश राऊत, बाबुराव गावित, लक्ष्मण गावित, जयवंत राऊत, अशोक खिराडी, सुरेश पवार, देवराम गावित, यमुना पवार, पंडीत घाटाळ, कमळा चौधरी,ratan आदी ग्रामस्थ व विकास समिती रानविहिर गावचे महिला व तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव झिरवाळ यांनी केले.
तालुक्यातील रानविहिर येथे स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने स्वप्नातील सुंदर गाव कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक निलेश पाटील सह ग्रामस्थ. उभारण्यात आलेला सांस्कृतिक देखावा.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : २७ मार्च २०२६
