येडशी येथे विजयसिंह नलावडे यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन
दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार : दिनांक : २३ एप्रिल २०२६

येडशी, दिनांक.23(प्रतिनिधी : सुभान शेख):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रहिवासी असलेले व शिंगोली येथील ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजयसिंह विलासराव नलावडे वय अंदाजे – 43 यांचे दिनांक 22 एप्रिल 2026 बुधवार रोजी तीव्र हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या सेवेबद्दल वेगवेगळे राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कारांनी त्यांचा सन्मानित करण्यात आला होता. ते ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 23 एप्रिल 2026 गुरुवार रोजी सकाळी येडशी येथे श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान रोड च्या कडेला स्वतःची शेती असलेले शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच , नलावडे यांनी ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना तसेच , ग्रामपंचायत अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते. व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ धाराशिव या संघटनेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक महत्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच , यांच्या पश्चात , आई , पत्नी , मुलगा , मुलगी , असा परिवार आहे. त्यांच्या हृदयविकाराच्या आजाराच्या निधनामुळे ग्रामविकास विभाग कर्मचारी वर्ग तसेच येडशी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून , सर्व ग्रामस्थानातुन श्रद्धांजली अर्पण करून , येडशी परिसरात दुःखाचा डोंगर कोसळुन , सर्वत्र नागरिकात शोकाकुल पसरली आहे. तसेच , दिनांक 23 एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी वेळेस पाच वाजण्याच्या सुमारास शिवसेना उबाठा गटाचे धाराशिव- कळंब मतदार संघाचे लोकप्रिय आमदार – कैलास ( घाडगे) पाटील यांनी स्वतः येडशीत येऊन , मयताच्या घरी ग्रामविकास अधिकारी- विजयसिंह विलासराव नलावडे , दत्तात्रय दादाराव देशमुख , एकनाथ गव्हार , सुधाकर एकनाथ क्षीरसागर , असे एकूण चार मयतांच्या घरी जाऊन सांत्वन सदिच्छा भेट दिली. सदिच्छा भेट देत असताना , येथे उपस्थित असलेले , येडशी गावचे ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा शिवसेना उबाठा गटाचे नेते – गजानन भैया नलावडे , विकास (बिबन) नलावडे , धाराशिव जिल्हा उपप्रमुख- अमोल पवार , चंदन नलावडे , गणेश पवार , बाळासाहेब पवार , सुभान शेख आदि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी प्रतिनिधी सुभान शेख

