जोपुळ शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार दिनांक : २४ एप्रिल २०२६

फोटो १ दिंडोरी २४ ०४ २०२६

दिंडोरी ( प्रतिनिधी :- रावसाहेब जाधव ):-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोपुळ येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभाचे नियोजन विद्यार्थ्यांनी स्वतः केले होते. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळा व शिक्षकांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आशाबाई जाधव होत्या. यावेळी शिक्षक विलास जमदाडे, वर्गशिक्षक रावसाहेब जाधव व अनिल भरीतकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी शाळेला आरसा व भारतमातेची प्रतिमा भेट दिली. तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन व पाणी बाॅटल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांसाठी मिसळपावचे मिष्टान्न भोजन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका आशाबाई जाधव, विलास जमदाडे, रावसाहेब जाधव, शरद धादवड सर, संतोष जाधव, आशिष पाटील, शुभम पाटील, योगेश कुलकर्णी, किशोर गवळे व सचिन जोशी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी मोरे हिने केले, तर आभार प्रदर्शन कार्तिक सितान यांनी केले.अशाप्रकारे इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार दिनांक : २४ एप्रिल २०२६