सुरगाणा शहरात मध्यरात्री भीषण आग; १० गाळे व टपऱ्या जळून खाक, सुमारे २० लाखांचे नुकसान

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी : रतन चौधरी ):- शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या तलाठी चाळ परिसरात ३० एप्रिल रोजी मध्यरात्री भीषण आग लागून व्यावसायिक गाळे व टपऱ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुमारे १० गाळे व अनेक टपऱ्यांमधील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला असून एकूण अंदाजे २० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सुरगाणा शहरात खळबळ उडाली असून, नुकसानग्रस्त व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.