दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : १ मे २०२६

भिमजयंती उत्सव शिल आणि चारित्र्य संपन्न नागरिक घडविणारी लोक चळवळ आहे – प्रवीण गायकवाड
मुदखेड, (नांदेड ) (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड) :-
तालुक्यांतील पिंपळकौठा (चोर ) या गावी विश्वभूषण, परमपूज्य बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून दीप व धूप प्रज्वलना नंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ उपासक प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व सामुदायिक पंचशील त्रिशरण ग्रहणानंतर कार्यक्रमाचे रूपांतर विचारसभेत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून बोलतांना प्रवीण गायकवाड म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कांहीं दलित समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते विश्ववंदनीय अष्टपैलू कर्ते सुधारक होते, कायदा,जल सिंचन, ऊर्जा, अर्थ, शिक्षण, सामाजिक,राजकीय, धार्मिक सर्वच पातळीवर अचाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब ज्ञानाचे प्रतीक म्हणून जगाने मान्य केले आहे. तेंव्हा अशा महामानवाचे अनुयायीं म्हणून जयंती उत्सव साजरा करतांना समाज बांधवानी शिल आणि चारित्र्य संपन्न वर्तनाने आपली ओळख समाज मनात निर्माण करावी असे उपस्थितांना आवाहन करून,अलीकडच्या काळात भीम जयंती उत्सव हा नाच गाण्यापुरता संकुचित होतांना दिसत असल्या बाबत खेद व्यक्त करताना सांगितले की,भीम जयंती उत्सव हा शिल आणि चारित्र्य संपन्न नागरिक निर्माण करण्याची लोक चळवळ आहे असा संदेश गावागावांतून पेरला जावा हीच खरी बाबासाहेबाना आदरांजली ठरेल असे परखड मत व्यक्त केले.
यावेळी प्रिन्स हनुमंते,प्रतीक्षा सूर्यवंशी,प्रतीक्षा हनुमंते,प्रज्ञा विनोद हनुमंते,प्रिया हनुमंते बाल वक्त्यांचे तसेच गावांतील प्रतिष्ठित नागरिक परमेश्वर भिमलवाड, नामदेव भिमलवाड,यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी समायोचित भाषणे झाली सायंकाळी ४ वाजता तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रांची मिरवणूक गावांतील प्रमुख मार्गाने काढण्यात आली संपूर्ण परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणांनी दुमदुमून गेला होता यावेळी सरपंच प्रतिनिधी माधव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमांचे सूत्रसंचलन डॉ.प्रा.साहेबराव हनुमंते यांनी केले तर आभार सुनील हनुमंते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दीपक हनूमंते,उपाध्यक्ष प्रफुल हनुमंते,सचिव रवी हनुमंते,कोषाध्यक्ष सचिन हनुमंते,माधव हनुमंते,कचरू हनुमंते,मारोती हनुमंते,संजय हनुमंते रवी हनुमंते,राहुल हनुमंते,शिवानंद हनुमंते, दास हनुमंते आदीनी परिश्रम घेतले.