





बिटको महाविद्यालयात ‘ स्वच्छता अभियान ‘ मोहीम
β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ‘ स्वच्छता अभियान ‘मोहीम – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि . ०१/१०/२०२३
β⇒ नाशिकरोड, ता ०१ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ‘ आजादी का अमृतमहोत्सव ‘ अंतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी ‘ स्वच्छता अभियान ‘ राबविण्यात आले . यात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , सर्व उपप्राचार्य , विभागप्रमुख , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ सुनिता नेमाडे , लेफ्ट. डॉ. विजय सुकटे , डॉ.विलास पगार , डॉ. डी. जी. शिंपी , डॉ. सुदेश घोडेराव , जयंत भाभे , कुलसचिव राजेश लोखंडे , राष्ट्रीय सेवा योजना , एनसीपी , विद्यार्थी कल्याण मंडळ वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते .
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०