





एस. एम. आर.के.महिला महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता अभियान’
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 1 ऑक्टोबर २०२३
β⇒ नाशिक, ता -1 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :- येथील एस. एम. आर.के.महिला महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत महात्मा गांधी जयंती नमित्त ‘स्वच्छता अभियान’ व मेरी माटी मेरा देश याअभियनांतर्गत ‘अमृत कलश संकलन अभियान विथ सेल्फी’ हा कार्यक्रम दरम्यान घेण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ. सौ.दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सौ. कविता पाटील व डॉ. सौ. नीलम बोकील यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवून महाविद्यालयातील संपूर्ण परिसर व कृषी नगर येथील जॉगींग ट्रॅक स्वच्छ करून आपले श्रमदान केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या स्वच्छता अभियानात दिलेले श्रमदान व आलेला अनुभव या विषयक आपल्या प्रतिक्रिया ही सांगितल्या. त्याचरोबरोबर ‘अमृत कलश संकलन’ अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ.कविता पाटील मॅडम यांनी केले व त्यांनीही सेल्फी घेतली.सर्व विद्यार्थिनींनीही आपापली सेल्फी घेऊन दिलेल्या लिंक ला अपलोड ही केले. यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.सौ. गीता यादव व कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस कार्यक्रम अधिकारी सौ. शोभा सूरोशे तसेच त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी ही उपस्थित होत्या.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा: मुख्य संपादक : डॉ. भावात महाले : मो. ८२०८१८०५१०