Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसाहित्यिक

β : सुरगाणा(नाशिक)⇔”आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार” दिनानिमित्त ‘कोठो’, सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास’नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)

β : सुरगाणा(नाशिक)⇔"आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार" दिनानिमित्त 'कोठो',सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास'नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)

018501

“आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार” दिनानिमित्त ‘कोठो’, सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास’ नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना 

β : सुरगाणा(नाशिक)⇔"आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार" दिनानिमित्त 'सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास'नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)
β : सुरगाणा(नाशिक)⇔”आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार” दिनानिमित्त ‘कोठो’ ,सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास’नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार  : दि, 08 सप्टेंबर  2024

   β⇔सुरगाणा(नाशिक),दि.08(प्रतिनिधी:रतन चौधरी):- आदिवासी महाराष्ट्रातील लोककला, खाद्य संस्कृती,पावरी, ढोल वाद्य प्रदर्शित होणार हिमाचल भूमीवर आदिवासी महिला भगिनींची लाल फडकीचा पेहराव झळकणार हिमाचलच्या रंगमंचावरआदिवासी समन्वय मंच भारत व भारत संयुक्त राष्ट्र संघ युनो द्वारा घोषित भारतातील आदिवासी समुदाय आयोजित १८ वे आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय संमेलन “१३ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील जिल्हा कला केंद्र, जिल्हा भाषा कार्यालय ‘कोठो'(जि.सोलन), या ठिकाणी १२ व १३ सप्टेंबर दोन दिवशीय आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सहभाग राष्ट्रीय आदिवासी एकात्मता, देशातील आदिवासी जमाती जोडण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवरील आदिवासींची कला, सांस्कृतिक, रुढी, परंपरा,पेहराव, देव देवता, बोलीभाषा याचे आदानप्रदान व्हावे यासाठी सहभाग घेतला जातो.
      सदर ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार’ दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातून शेकडो तर महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते हिमाचल प्रदेशकडे रवाना झाले आहेत.  नाशिक जिल्ह्यातून प्रा.अशोक बागुल, जयवंत गारे, किसन ठाकरे, सुभाष गवळी, राम चौरे, के. के. गांगुर्डे, गणेश भोये, विजय पवार, विजय घुटे, अशोक पवार, निवृती जाधव, विष्णू जाधव, चेतन खंबायत, रतन चौधरी, उत्तम वाघमारे, सुधाकर भोये, भास्कर बागुल, हरिराम गावित, शंकर बागुल, कृष्णा देशमुख, भागवत धुम, गणेश वाघमारे, मधुकर पाडवी, पंडित बहिरम, देवेंद्र ढुमसे, पी. यू. गावित आदी निमंत्रित आदिवासी सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते हिमाचल येथे उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी हे राष्ट्रीय स्तरावरील संमेलन देशाच्या वेगवेगळ्या भागांत संमेलन भरविण्यात आले आहे. २०१६ देशाची राजधानी  ( जंतर-मंतर, नवी दिल्ली), २०१७ महाराष्ट्र (नागपूर), २०१८ मध्ये झारखंड (रांची), २०१९ कर्नाटक (म्हैसूर), २०२० गुजरात (भिलोडा),२०२१ आसाम (दीपू ),२०२२ छत्तीसगड,श (रायपूर), २०२३ भद्राचलम हैद्राबाद ( तेलंगणा), येथे घेण्यात आले होते, तर यावर्षाचे संमेलन “हश कोठो” सोलन (हिमाचल प्रदेश), येथे संपन्न होत आहे.
         
β : सुरगाणा(नाशिक)⇔"आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार" दिनानिमित्त 'सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास'नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)
β : सुरगाणा(नाशिक)⇔”आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार” दिनानिमित्त ‘कोठो,”सोलन (हिमाचल प्रदेश) राष्ट्रीय संमेलनास’नाशिक जिल्ह्यातून हजारो आदिवासी कार्यकर्ते रवाना-(प्रतिनिधी:रतन चौधरी)
 या  संमेलनात पुढील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. स्वागत समारोह, परिसंवादात आदिवासी बहुल राज्यांची स्थिती, समस्या समाधान, दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्य पूर्व भागातील मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उडीसा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, दादरा नगरहवेली, महाराष्ट्र, गोवा, उत्तर भारतातील हिमालय, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उतर पुर्व भारतातील त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मणिपुर, मिझोरमा या राज्यांची विकासाच्या आधुनिक संकल्पनेत आदिवासी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पारंपारिक ज्ञानाचे संरक्षण आणि प्रसारामध्ये आदिवासी महिलांची /युवकांची भूमिका, आदिवासींचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हक्क आणि वास्तविक स्थिती, आदिवासींचे पारंपारिक ज्ञान आणि चालीरीतींमधील वैज्ञानिक ज्ञान, आदिवासी बोली भाषा, जल, जंगल, जमीन जतन व संवर्धन, साहित्य आणि इतिहास, पेसा कायदा आणि ज्या राज्यात लागू करण्यात आलेला आहे. तेथील अंमलबजावणी स्थिती, वन अधिकार कायदा आणि अंमलबजावणी, राष्ट्रीय आदिवासी धोरणाची सद्यस्थिती, भूसंपादन कायदा आदिवासी चे विस्थापन सध्याची स्थिती, डिलिस्टिंगवर चर्चा, काही प्रदेशांमध्ये, आदिवासींच्या मूळ यादीत समावेश केलेला नाही. यावर आदिवासी काल, आज आणि उद्या संविधानिक हक्क अधिकार, आदिवासी महिलांना संपत्तीचे अधिकार मिळणे, अट्रॉसिटी कायदा व सध्यस्थिती, जनगणनेत पूर्वीप्रमाणेच आदिवासींसाठी स्वतंत्र धर्म कॉलम अथवा स्तंभावर चर्चा, देशातील आदिवासींवरील अन्याय अत्याचार,मणिपूर महिला अत्याचार, समान नागरी कायदा, या  विषयांबरोबरच आदिवासींच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक समस्यांवरही चर्चा केली जाणार आहे.  तसेच १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता विविध राज्यांतून आलेल्या सांस्कृतिक गटांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील आदिवासींचे पावरी हे वाद्य वरील नृत्य, ढोल नृत्य, ठाक-या नाच सादरीकरण केले जाणार आहे. १३ सप्टेंबर रोजी पारंपारिक आदिवासी वेशभूषेत नाशिक जिल्ह्यातील आदिवासींची लाल फडकीतील पेहराव मधील आदिवासी भगिनी सहभागी होणार आहेत. रॅली व त्यानंतर सार्वजनिक सभेत रूपांतर होऊन विविध राज्यांच्या समस्यावर सामूहिक तसेच गटा – गटात चर्चा करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 
        या १८ व्या जागतिक आदिवासी अधिकार दिवसाच्या निमित्ताने दोन दिवशीय राष्ट्रीय संमेलन होणार असून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने १३ सप्टेंबर २००७ रोजी आदिवासींच्या संरक्षणासाठी ४६ कलमी अधिकार घोषणापत्र जाहीर केलेले आले. या घोषणापत्रात आदिवासींचे अस्तित्व, हक्क, अधिकार आणि विकासातील सातत्य बघता आदिवासींचे अधिकार काय आहे. भारतीय संविधानात कोणते विशेष अधिकार बहाल केलेले आहेत, यावर विचारमंथन व सामुदाईक ठराव संमत करून शासनास सादर करण्यात येणार आहेत. या अधिकार दिवसाला सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी नंदुरबार, धुळे, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, नागपूर, गोंदिया येथून हजारो कार्यकर्ते हिमाचल प्रदेश कडे येत्या ९ ते १० सप्टेंबर दरम्यान होणा-या संमेलन करिता विमान, रेल्वे, खाजगी प्रवासी बस, कार या वाहनाने रवाना होत आहेत. यामध्ये सुरगाणा, कळवण, बागलाण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, साक्री या तालुक्यातील आदिवासी बांधवांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते इतर शेकडो प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रा. अशोक बागुल यांनी दिली आहे. संमेलनाचे आयोजन व नियोजन आदिवासी समन्वय मंच भारतचे कार्यकर्ते आप मुथइया वी,ॲड. विक्रम पर्ते, नकताराम भील, स्टेलीन इंग्ती, के. ही. मार्डी, विनय एक्का, डॉ. सुनिल पर्हाड, उत्पल चौधरी, वेणीलाल वसावा, ममता कुजूर, बीश्वनाथ तीर्की, आरेम पापाराव, नारायण जीत नेगी, डॉ. देव कुमार नेगी, विनय नेगी, कैलास नेगी, सुरज नेगी, बन्सीलाल नेगी यांनी केले आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                           ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!