





एकनाथ गायकवाड यांच्या “गणित रोबोटची गगन भरारी” विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक, राज्यस्तरावर निवड

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.10 जानेवारी 2024
β⇔सुरगाणा, दि.10 ( प्रतिनिधी: एकनाथ शिंदे ) :– सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्ते येथील शिक्षक एकनाथ गायकवाड यांनी 3ते 5जानेवारी रोजी एकावन्नवे विज्ञानप्रदर्शन ब्रम्हा व्हॅली अंजनेरी नाशिक विद्यार्थी शिक्षक विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेऊन एकनाथ पांडुरंग गायकवाड याची जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश आले असून त्यांना उंच शिखरावर नेऊन पोहचवले. विज्ञान प्रदर्शनामध्ये सुरगाणा तालुक्याचा गणिताचा रोबोटला प्रथम क्रमांक मिळाला असून राज्यस्तरावर निवड झाली आहे . या निवडीमुळे सुरगाणा तालुक्याचे नाव जिल्हाभर ओळख निर्माण करणारी ठरली आहे . त्याच बरोबर जि .प. हस्ते शाळेचे कौतुक तालुकाभर होत आहे. राज्यस्तरीय निवडीमुळे गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी, हस्ते केंद्रातील केंद्र प्रमुख व शिक्षक यांनी एकनाथ पांडुरंग गायकवाड यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०