Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीयसाहित्यिक

β : नागपूर :⇔”चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला “गुरू”-गुरू पौर्णिमा-(प्रतिनिधी : रमेश कृष्णराव लांजेवार)

β : नागपूर :⇔"चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला "गुरू"-गुरू पौर्णिमा-(प्रतिनिधी : रमेश कृष्णराव लांजेवार)

0 1 5 5 3 8

                                                  
“चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला “गुरू” – गुरू पौर्णिमा

β : नागपूर :⇔"चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला "गुरू"-गुरू पौर्णिमा-(प्रतिनिधी : रमेश कृष्णराव लांजेवार)
β : नागपूर :⇔”चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला “गुरू”-गुरू पौर्णिमा-(प्रतिनिधी : रमेश कृष्णराव लांजेवार)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. 21 जून  2024

β⇔,नागपूर, दि.21 (प्रतिनिधी :रमेश कृष्णराव लांजेवार ):- प्राचीन काळापासून गुरूच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील “पौर्णिमा” साजरी करण्याची परंपरा गेल्या ५ हजार वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळेच भारतात गुरूपौर्णिमेला आगळेवेगळे महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनीच गुरू या शब्दाचा मान-सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण “गुरू शिवाय ज्ञान नाही” ही म्हण सत्य आहे. गुरू पौर्णिमेचे महत्त्व जाणून चांगले विचार आचरणात आणायला हवे. गुरूचे महत्त्व म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला चांगल्याप्रकारची चालना, गुण, शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रेम, आपुलकी, प्रेरणा, जिव्हाळ्याच्या गोष्टी इत्यादींचे जो व्यक्ती चांगले आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतो तोच आपला खरा गुरू समजायला पाहिजे.

                    आई-वडील हे गुरू या परीभाषेपेक्षाही महान आहेत. जो पर्यंत सुर्य-चंद्र-आकाश-पाताळ आहे तोपर्यंत आई-वडीलांचा मान गुरू पेक्षाही महान आहे आणि राहील यात दुमत नाही. कारण आई-वडीलां समोर सर्वच नतमस्तक होतात आणि व्हायला हवे. आई मायेचे पांघरूण घालून मुला-मुलींना लहानाचे मोठे करते तर वडील संपूर्ण कुटुंबाची ढाल बनून कुटुंबाचे रक्षण करण्याचे काम करीत असतो. त्यामुळे आपण नेहमी पहातो की छोटी दुर्घटना घडली तर आपण “आईग” म्हणून आईला हाक मारतो, यावेळी आईच्या रूपात सर्वच धावून येतात. यामुळे आपले दु:ख कमी होते. त्याच्या विपरीत जर मोठी घटना घडली तर आपण “बापरे” म्हणतो. यावेळेस संपूर्ण गाव जमा होवून वडिलांच्या रूपात धावून येतो. अशाप्रकारे आई-वडीलांचे नाते किती महान व अनभिज्ञ आहे जगात दिसून येते. म्हणजेच या जगात जो आपले पालन-पोषण करतो तो आपला सर्वात मोठा गुरू आहे. वडिलांचे नाते किती महान आहे हे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे आपण नेहमी पाहतो की आई-वडीलांचा अपमान कोणीही सहन करीत नाही आणि करणार नाही. अशा परिस्थितीत मुलं-मुली तुटून पडतात. यात खरे गुरु-शिष्याचे नाते दिसून येते. म्हणजेच जगाच्या पाठीवर सर्वात मोठे गुरू-शिष्याचे नाते म्हणजे आई-वडीलच. यात मोठा वाटा म्हणजे आई-वडीलांचे मुलांवरील संस्कार व मार्गदर्शन. याच्यातूनच गुरू-शिष्याचा जन्म झाला. आई गुरूची भूमिका बजावून वटवृक्षाच्या अफाट सावलीत मुलांची जोपासना करते तर वडील याच वटवृक्षाचा पहारेकरी बनून परिवाराचे जतन व संरक्षण करतो. माणसाच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव येतात, कठीण समस्या येतात, सुख-दु:खाच्या घटना घडतात. यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी प्रत्येकाला गुरूची आवश्यकता असते. कारण गुरू शिवाय संपूर्ण मार्ग अधुरा असतो. आपण शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा पाय ठेवतो, तेव्हा शिक्षक आपला गुरुच असतो. कारण पुढील आयुष्याचे खरे मार्गदर्शन आपल्याला शिक्षकांपासून मिळत असते. आपण शाळेतल्या पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे अंतिम शिक्षणापर्यंत शिक्षक आपला गुरूच असतो. कारण यांच्या पासूनच आपल्या बुद्धीमत्तेचा आणि पुढील वाटचालीचा मार्ग मोकळा होतो व आपल्याला पुढील दिशा आणि मार्ग दिसून येतात. त्याचप्रमाणे क्रीडाक्षेत्रात पदार्पण करतांना गुरूची अत्यंत आवश्यकता असते. कारण संपूर्ण क्रीडाक्षेत्राचे भवितव्य आपल्या गुरू विद्येवर अवलंबून असते. त्यामुळे आपण क्रीडाक्षेत्रात नेहमी पाहतो की कुशलता, कर्तबगारी, उत्कृष्ट खेळाडू आणि पराक्रमी खेळाडू तयार करतांना गुरू-शिष्याची संपूर्ण कसोटी लावून आपली ताकद झोकली जाते. तेव्हाच पीटी उषा, कपिल देव, तेंडुलकर, दारा सिंग, खली, मिल्खा सिंग, मेजर ध्यानचंद असे अनेक नामांकित व महान खेळाडू गुरूमुळेच तयार झाले आणि होतातसुद्धा. गुरूच्या परीक्षेत जो-जो पास होतो, तीच शिष्यांकडून गुरू दक्षिणा असते. आपण महाभारत ते रामायणमध्ये गुरू-शिष्याचे काय नाते असते ते आपण जाणतोच. द्वापरयुग, सत्ययुग, कलियुग किंवा कोणतेही युग असो गुरू शिवाय पुढचा मार्ग निघणे अवघड असते. यासाठी गुरूची आवश्यकता असणे गरजेचे असते. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर यातही आपल्याला गुरू-शिष्याचे नाते दिसून येते. यातून राजकीय पुढारी तयार होतात.

                   आपण पारतंत्र्यात असतांना स्वतंत्र लढा जिंकण्यासाठी क्रांतीकारकांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्याचा लढा उभा केला. त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात राहून मोकळा स्वास घेऊ शकतो. कारण क्रांतीकारकांना गुरूचे मार्गदर्शन योग्य लाभले त्यामुळेच क्रांतिकारक शिष्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे गुरू शिवाय कोणतेही काम होणे शक्य नाही. यासाठी कोणतेही क्षेत्र असो अनुभव, ज्ञान, माहिती मिळवण्यासाठी गुरूची तेवढीच आवश्यकता असते. म्हणूनच म्हटल्या जाते “गुरू बिना ज्ञान अधुरा”. त्याचप्रमाणे आपण पूजाअर्चना करतो याचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता निर्माण व्हावी. आपण आपले काम फत्ते व्हावे याकरिता देवी-देवता व पूर्वजांची पूजाअर्चना करतो. कारण आपण केलेल्या कार्याला यश प्राप्त झाले पाहिजे. भारत भूमीत गौतम बुद्ध, ऋषीमुनी, त्यागी, साधुसंत, थोरमहात्मे होऊन गेले. याच्याच पाऊलावर पाऊल ठेवून योगा व व्यायामाच्या मदतीने आपले शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे आज भारताला योगाच्या बाबतीत विश्व गुरू म्हणून संबोधल्या जाते. त्याचप्रमाणे भारताला विश्व शांतीचा गुरूसुद्धा संबोधल्या जाते. कारण जगाच्या पाठीवर शांतीपूर्ण देश म्हणजे भारताची जगात प्रचीती आहे. म्हणजेच आज भारत विश्व शांतीचा गुरू असल्याचे दिसून येते. ह्या संपूर्ण घटनांचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा, धर्माची जोपासना यामुळेच भारताला विश्व गुरू म्हणून संबोधल्या जाते.

                   गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने हेच सांगू इच्छितो की मुलांनी आई-वडीलांच्या सेवेला, त्यांच्या आज्ञेला व त्यांनी सांगितलेल्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन गुरू-शिष्याच्या नात्याची जोपासना सर्वांनीच केली पाहिजे. आताही भारतात गुरू शिष्याचे नाते अतूट आहे व टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृती, भारतातील अनेक धर्म, जाती-पंथ यांचा एकत्रित पणा यामुळेच आपल्याला गुरू-शिष्याचे नाते अधिक घनिष्ठ असल्याचे दिसून येते. शिष्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो, त्याची अवहेलना कुठेही होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. यातच शिष्यांची महानता दिसून येईल. गुरू पौर्णिमेबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की, परिवारापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही. मित्राशिवाय आयुष्य नाही यात आपल्याला गुरूचा गोडवा किती महान आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येते. म्हणजेच प्रत्येक परिवार गुरूची भूमिका आपआपल्या परीने पार पाडत असतो. त्याचप्रमाणे सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गुरू-शिष्याच्या नात्याला कोणीही कलंकित करणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण गुरू-शिष्याच्या नात्यानेच आपण घडतो आणि घडवतो, आपला परिवार घडतो व यातूनच देश घडतो. “आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगार, मांगल्याचे सार आई माझी”. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो की देशातील वाढते प्रदूषण, ऑक्सिजनचे कमी होत असलेले प्रमाण, आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढणारा धोका रोखण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या परिसरात किंवा घरी वृक्षारोपण केले पाहिजे. ज्याच्या परिसरात जागा नसेल त्यांनी एखाद्या कुंडीमध्ये झाड लावून वृक्षारोपण करायला हवे. कारण वाढते प्रदूषण मानव, जीवजंतू, वन्यप्राणी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!             

                लेखक.        
                                     रमेश कृष्णराव लांजेवार        
                                    (माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर).       

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                 ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!