‘स्पर्धा परीक्षा : तयारी यशाची’ पुस्तकाचे आज प्रकाशन
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.5 एप्रिल 2024
β⇔नाशिक– दि.5(प्रतिनिधी : ब्रिजकुमार परिहार) : वरिष्ठ पत्रकार व ‘सर्वस्पर्शी’ दिवाळी अंकाचे संपादक, प्रकाशक ब्रिजकुमार परिहार यांनी लिहिलेल्या ‘स्पर्धा परीक्षा : तयारी यशाची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. 5 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता महाकवी कालीदास कलामंदिर येथे होणार आहे. ‘तन्मय प्रकाशन’ने हे पुस्तक निर्माण केले असून, गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते व ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोधर मावंजो (गोवा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे समुपदेशन करणारे हे पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षेबाबत मराठी माणसाच्या मनात असलेली अवास्तव भिती दूर व्हावी, तसेच विद्यार्थ्यांनी नेमकी कशी तयारी करावी याबाबत समुपदेशन करणे हा या पुस्तकाचा मुळ हेतू आहे. केवळ शासकीय सेवेत जाण्याचा राजमार्ग म्हणून न पाहता, एकुणच यशस्वी जीवनाची तयारी म्हणून विद्यार्थी व पालकांनीही स्पर्धा परीक्षांकडे पाहावे, असा दृष्टीकोन विकसित होण्यास या पुस्तकामुळे मदत होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या विचारात असलेले विद्यार्थी व पालकांनीही हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
शुक्रवार, दि. 5 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाचला महाकवी कालिदास कलामंदिर येथे गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याच कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन डॉ. रविंद्र सपकाळ अध्यक्षस्थानी असतील. तर ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोधर मावंजो, ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, गिरजा महिला मंचच्या प्रदेश अध्यक्षा डॉ. अश्विनीताई बोरस्ते, ऑलिम्पिक विजेती खेळाडू कविता राऊत, अभिनेत्री रूपाली पवार, राज्य बाल हक्क संरक्षण समितीच्या सदस्या सायली पालखेडकर, अभिनेत्री माधुरी चराटे व पुनम पाटील यावेळी प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे संजय आहेर, प्रशांत कापसे, बाळासाहेब गिरी, प्रा. डॉ. गिरीष पाटील, सोमनाथ पगार व पुस्तकावर बोलु काही टीमने केले आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510