येडशीत पत्रकार दिनानिमित्त पुष्प गुच्छदेत पत्रकारांचा सन्मान
β : “त्रकार दिन
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.6 जानेवारी 2024
β⇔येडशी,ता.६(प्रतिनिधी : सुभान शेख ):- आज दि.६ जानेवारी २०२४ शनिवार रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करून येडशी येथे ग्रामपंचायत महिला सरपंच – डॉ. सोनिया पवार यांचे पती व ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत पवार यांच्या वतीने सर्व पत्रकारांना पुष्प गुच्छ फाईल सप्रेम भेट देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रशांत पवार यांनी पत्रकारांचा पुष्प गुच्छ, फाईल सप्रेम भेट देऊन सन्मान करत सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की , ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेवर येऊन १ वर्षे पूर्ण झाले आहे. या एक वर्षांत येडशीमध्ये मिळालेल्या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी केला आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारीचे नियमित पगार, कर वसूलीची व्यावस्था, फेर आकारणी प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त लावली आहे , पहिल्याच ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मंजूर थेअटर ला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार नाही, आय. एस. ओ. ग्रामपंचायतमध्ये काम सुरू केले आहे, श्री. रामलिंग देवस्थानकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले कचरा हटवले , आठवडी बाजार, जय हिंद बाजार, मैदानात दर सोमवारी बाजार बसवण्यास सुरुवात केला.
सातत्याने 2 वर्षांपासून पाठपुरावा करून सोनेगाव रोड उड्डाण पूलची मंजुरी करण्यात आली , ३० बेडचे ग्रामिण रुग्णालय मंजूर करण्यात आले, पाणी – जलजीवन मिशन अंतर्गत कळंब तालुक्यातील चोराखळी तलावातून योजनेची तांत्रिक मंजुरी करून आणली, उन्हाळ्यात येडशी गावाला ग्रामपंचायत मार्फत टँकरने पाणी पुरवठा केला, नवीन विद्युत डी.पी. मंजूर करून प्रभाग क्रमांक १ , २ व ६ मध्ये विद्युत डिपी मंजूर करून आणले आहे, गावातील नागरिकांना त्रास होत असलेले माकडांचा त्रास कमी करण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने तीस हजार रुपये दिले , भीमनगर परिसरातील समाज मंदिराचे काम सुरू केले , अटल भुजल योजना आराखडा सादर केला, नवीन ग्रामसचिवालय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे, बाल ग्रंथालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरुवात करणार आहोत, सिटी सर्व्हेर ऑफीस मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केले आहे, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गुणात्मक सुधारणा व मातृभाषेसाठी आग्रह केला आहे. जनता विद्यालय मुलींची सुरक्षा व गुणात्मक शिक्षण देण्यास सांगितले आहे. आदिवासी घरकुल योजना ६४ घरांसाठी घरकुल योजना मंजूर करण्यात आले. अशी माहिती भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. हे कार्य करीत असताना सोबत असलेले संतोष डुमणे यांनी सर्वात जास्त विकासाचे काम करण्यासाठी श्रेय घेतले आहे. आज येडशी गावामध्ये एकमेव सरपंच म्हणून ठरत आहे.या कार्यक्रमास उपस्थित असलेले पत्रकार – महादेव सस्ते, संतोष खुने, दत्ता पवार, अर्जुन सुतार, संजय शिंदे , हैदर पटेल, सल्लाऊदिन शेख, सुभान शेख, वृत्तपत्र विक्रेते – परमेश्वर सुकाळे , गावातील नागरिक – संतोष डुमणे , निलेश तपसे , शुभम कुंभार आदि सर्व कार्यक्रमास उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो. ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)