β : नाशिक (कॉलेजरोड) :⇔: गोखले फार्मसी महाविद्यालयास नॅकतर्फे राष्ट्रीय मूल्यांकनात प्रथम फेरीतच ‘‘अ ’’ श्रेणी प्रदान …! …! ( प्रतिनिधी : प्रा.सौ. दीपाली भंडारी )
β : नाशिक (कॉलेजरोड) :⇔: गोखले फार्मसी महाविद्यालयास नॅकतर्फे राष्ट्रीय मूल्यांकनात प्रथम फेरीतच '‘अ ’' श्रेणी प्रदान ...! ...! ( प्रतिनिधी : प्रा.सौ. दीपाली भंडारी )
गोखले फार्मसी महाविद्यालयास नॅकतर्फे राष्ट्रीय मूल्यांकनात प्रथम फेरीतच ‘‘अ ’’ श्रेणी प्रदान …!
‘नाशिक जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयांत सर्वोच्च्य CGPA (३.२२) मिळवणारे एकमेव गोखले फार्मसी महाविद्यालय’
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि . 28 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक (कॉलेजरोड) , ता. 28 ( प्रतिनिधी : प्रा.सौ. दीपाली भंडारी ) :– गोखले एजुकेशन सोसायटी संचलित सर डॉ. मो.स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविदयालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदे ( NAAC ) तर्फे ‘A’ राष्ट्रीय मानांकन देण्यात आले असून, नाशिक जिल्हातील फार्मसी महाविद्यालयांपैकी सर्वोच्च्य CGPA (३.२२) मिळवणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. कुठल्याही महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, त्याचा दर्जा, सोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयी व सुविधांचा एक प्रकारे पडताळणी करून राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषदेतर्फे राष्ट्रीय दर्जा मानांकन देण्यात येत असतो. नुकतेच १८ व १९ ऑक्टोबर रोजी नॅक समितीतर्फे महाविद्यालयाला भेट देण्यात आली होती. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, संशोधनकार्य, समाजोपयोगी उपक्रम, विद्यार्थ्यांकरिता आवश्यक सोयी व सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक विभागाची कामगिरी, पर्यावरणपूरक योजना, उत्कृष्ट कार्य व महाविद्यालयाच वेगळेपण याबाबतचा अहवाल प्राचार्य डॉ.सुनील अमृतकार यांनी सादर केला.
महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता विभागप्रमुख डॉ.प्रशांत पिंगळे व महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. दत्तात्रय शिनकर यांनी समितीला प्रथम चाचणी पडताळणी करिता आवश्यक असणारे संपूर्ण दस्तावेज सादर केले.सदर प्रक्रियेत सर्व निकषप्रमुख अनुक्रमे प्रा. डॉ.रमणलाल कचवे,डॉ.शिल्पा हारक,प्रा.साहेबराव बोरस्ते,प्रा.रावसाहेब घेगडे,प्रा.स्मिता शेळके,डॉ.धनश्री माळी यांचे मोलाचे योगदान लाभले. या पडताळणी मधूनच नॅक समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून गोखले फार्मसी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे (NAAC) ‘अ’ (A) CGPA ३.२२ /४ मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय असा दर्जा देण्यात आला आहे.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. सौ.दीप्ती देशपांडे,संस्थेचे विश्वस्त आणि संयुक्त कोषाध्यक्ष डॉ.आर.पी.देशपांडे ,प्रकल्प संचालक डॉ. पी.एम. देशपांडे,आस्थापना संचालक शैलेश गोसावी,प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की ‘ येत्या काळात नॅक समिती मूल्यांकन नसणाऱ्या महाविद्यालयांना विविध शिष्यवृत्ती तथा आदी योजनांचा लाभ घेण्यावर निर्बंध येऊ शकतात. असे असताना गोखले फार्मसी महाविद्यालय नाशिक जिल्हातील खाजगी महाविद्यालयापैकी सर्वोच्य CGPA मिळवणारे पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना २०१२ या साली झाली असून, नॅकच्या प्रथम फेरीतच महाविद्यालयास चांगला दर्जा प्राप्त झाला , हे उल्लेखनीय आहे. महाविद्यालयातून औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) चे पदविका – डी फार्म., पदवी – बी फार्म फार्म, पदव्युत्तर पदवी – एम.फार्म. तसेच विद्यावाचस्पती (Ph.D)पर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. सोबतच महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयातून विद्यार्थी घडवित असताना विद्यार्थ्यांना विविध अदयावत उपकरणांसोबत शिक्षण दिल्या जात असून महाविद्यालयाला मिळालेला दर्जा हा परिसरासाठी अभिमानास्पद बाब ठरत असल्याचे मत व्यक्त केले. नॅक मूल्यांकनामध्ये उत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे, ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी असल्यामुळे शिक्षणक्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रक्रियेत सर्व व्यवस्थापन , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, पालक व विविध आस्थापनांचे प्रतिनिधी , संपादक मंडळ प्रा . संदीप पुरकर, प्रा.सौ. दीपाली भंडारी (माध्यम आणि प्रचार विभाग) यांनी सहभाग नोंदवला.या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.सौ.दीप्ती देशपांडे, संस्थेचे विश्वस्त आणि संयुक्त कोषाध्यक्ष डॉ.आर.पी.देशपांडे ,प्रकल्प संचालक डॉ. पी.एम. देशपांडे,आस्थापना संचालक शैलेश गोसावी,प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार यांनी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०