संदीप फाऊंडेशन फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
संदीप फाऊंडेशन फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
β ⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: नाशिक , शनिवार,12 ऑगस्ट 2023
β ⇒महिरावनी (नाशिक ) 12 ( प्रतिनिधी :डॉ. कमलेश दंडगव्हाळ ) :- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणून ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकस्वरूपी माहितीचे वाचन करून समाज शिक्षित होतो. वाचन केल्याने माणसाचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले . महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री अमोल शिंदे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात माहितीचे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, समाज माध्यमे यावर माहिती उपलब्ध होत असते. आजची ग्रंथालये दोन माध्यमातून लोकांना सेवा देतात- ई जर्नल, ई-बुक्स याचबरोबर छापील पुस्तके लोकांच्या ज्ञानाची गरज भागवत असतात. बदलत्या काळाप्रमाणे ग्रंथालयाचेही स्वरूप बदलत चालले आहे.
प्रा. डॉ. कमलेश यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे महत्व व भारतीय ग्रंथालय शास्रात डॉ.एस.आर.रंगनाथन यांचे योगदान थोडक्यात सांगितले.संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, ओ. एस. डी. प्रमोद करोले आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री. दत्तात्रेय भालेराव यांनी केले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.
संदीप फाऊंडेशन फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
β ⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: मुख्य संपादक :डॉ. भागवत महाले ,
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)