खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 2 फेब्रुवारी 2024
β⇔ सिन्नर, दि.2 ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये सिन्नर तालुक्यातील कोणकोणत्या योजना राबवून सिन्नर तालुक्याचा विकास केला पाहिजे याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे आणि बाळासाहेब वाघ यांनी सविस्तर चर्चा केली. आणि सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी अधिका अधिक निधी उपलब्ध करून तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी नेमके काय केले पाहिजे. त्यासाठी बाळासाहेब वाघ आणि खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली यावरून बाळासाहेब वाघ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510