निवडश्रेणी व विविध मागण्यासाठी शिक्षक परिषद संघटनेचे धरणे आंदोलनासह आमरण उपोषण 6 नोव्हेंबरपासून सुरू
शिक्षक परिषद जिल्हा उपाध्यक्ष दिपक खैरनार तर महिला आघाडी दिंडोरी अध्यक्षपदी दिपाली थोरात
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : रविवार : दि 5 नोव्हेंबर 2023
β⇔ दिंडोरी , ता. 5 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नाशिक तर्फे निवडश्रेणीसाठी सहा नोव्हेंबरपासून शिक्षक परिषदेचे धरणे आंदोलन व आमरण उपोषणांचे सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती परिषद मेळावा प्रसंगी संजय बबनराव पगार संस्थापक कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथ. वि.)यांनी दिली. ते निवडश्रेणी त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करतांना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मेळावा शिवप्लाझा हॉल नाशिक येथे संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. ते मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सहा नोव्हेंबरपासून शिक्षक परिषदेचे धरणे आंदोलन व आमरण उपोषणांचे सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली . यावेळी निवडश्रेणी प्रकरण तपासणीसाठी परिश्रम घेणारे सोनवणे सर, गावित सरांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक अंतर्गत कार्यकारणी नुतनीकरण करण्यात आली.याप्रसंगी नवीन शिक्षक बांधवांनी संघटनेत प्रवेश करून नवीन पदभार देण्यात आला . दिपक खैरनार – जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रकांत पोपटराव पवार -मुख्याध्यापक प्रतिनिधी,लहु वालवणे,माणिक नामदेव वाघ -पेठ तालुका प्रतिनिधी,वसंत रघुनाथ राऊत सर -त्र्यंबकेश्वर,विलास राजाराम शिरोरे,संजय चव्हाण आदीसह शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महिला आघाडी कार्यकारणी नुतनीकरण करण्यात आली. जिल्हा महिला प्रतिनिधी-श्रीमती रत्ना भोसले, महिला आघाडी दिंडोरी तालुका अध्यक्ष – दिपाली थोरात, कार्यवाह-शोभा आधार पाटील, कार्यकारी अध्यक्ष-मनिषा लोहकरे, कार्याध्यक्ष-प्रभावती राऊत,मीना लोहकरे,स्मिता हिरे,संघटक-ज्योती पगारे, कल्पना वाघ,उपाध्यक्ष-सुनीता पाथरे,सुरेखा देवरे , शोभा देवरे(निकम),सहकार्यवाह-संजिवनी जगताप, रोहिणी जाधव,पदवीधर तालुका प्रतिनिधी-भारती भामरे , डीसीपीएस तालुका प्रतिनिधी- सुनिता बस्ते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यामेळाव्यात गुणवंत शिक्षक रमाकांत शिंदे, नाशिक गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेत्या वैशाली विलास जाधव,साहित्यिक व कवी-राजेंद्र उगले मान्यवरांचा सत्कार करुन गौरविण्यात आले. शिक्षक परिषद नेते दत्ता वाघे पाटील,जिल्हा नेते -रमेश गोहिल, कार्यवाह- राजेंद्र खैरनार , कार्याध्यक्ष- शांताराम कापसे , कोषाध्यक्ष – सुनिल आहिरे आदी जिल्हा पदाधिकारीसह दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, कार्यवाह- रविंद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष – सुभाष बर्डे, कार्यकारी अध्यक्ष -अशोक पवार ,जि.उपाध्यक्ष-राजेंद्र पवार, भाऊसाहेब भदाणे, सहकार्यवाह शिवाजी भोसले, तालुका सल्लागार राहुल परदेशी,भरत पवार,विजय ठाकरे,दादा इथापे आदी पदाधिकारी व सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी,शेकडो सभासद शिक्षक बंधुभगिणी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०