Breaking
आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजया धनेश्वर सेवानिवृत्त – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजया धनेश्वर सेवानिवृत्त - ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

0 0 2 5 6 3

बिटको महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजया धनेश्वर सेवानिवृत्त

β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजया धनेश्वर सेवानिवृत्त - ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
बिटको महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजया धनेश्वर सेवानिवृत्त – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

 

  β⇒ :  दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : नाशिक : शनिवार : दि. १ सप्टेंबर, २०२३

नाशिकरोड, ता ०१ : ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्राध्यापिका व उत्कृष्ट निवेदिका डॉ. विजया धनेश्वर या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या . त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता .

                          याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिक विभागीय सचिव व बी. वाय. के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी , प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर , विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे यासह सत्कारमूर्ती डॉ. विजया धनेश्वर व विनायक धनेश्वर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी डॉ. विजया धनेश्वर यांना सन्मानपत्र , शाल व बुके देऊन महाविद्यालयातर्फे डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयावतीने सौ. सुनिता नेमाडे , सौ. प्रणाली पाथरे , आर.एस. पाटील यांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू देण्यात आली . याप्रसंगी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी , प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , मराठी विभागप्रमुख डॉ. के. एम . लोखंडे , डॉ. सुनिता रणाते , वृषाली उगले , प्रा. गीता जागीरदार , श्रीमती टोचे यांनी भावी वाटचालीसाठी , दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी डॉ. विजया धनेश्वर यांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय सुकटे यांनी केले तर आभार जयंत भाभे यांनी मानले . या सोहळ्यास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आप्तेष्ट आदी उपस्थित होते.

β⇒ : दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो .८२०८१०८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!