





वणी चौफुली उड्डाण पुलाजवळ ‘ट्रक आणि लक्झरी बस’ चा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 23 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक,दि.23 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- पिंपळगाव बसवंत – वणी चौफुली उड्डाण पुलाजवळ गुरुवारी (दि. १९) पहाटे ४ वाजताच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि लक्झरी बसच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथे रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. चांदवडहून पिंपळगाव बसवंतकडे येणारी लक्झरी बस (क्रमांक AR 01 R 0027) आणि समोरून येणारा ट्रक (क्रमांक MH04 FJ 6887) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकचा क्लीनर अबूजफर रफिक अहमद (वय २३, रा. मालेगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर बस चालक अजमेरी युसुफ शहा याला नाशिकमधील रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, जी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सुटली. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )