





“हक्क, अधिकार व कर्तव्याची ग्राहकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. तरच होणारी फसवणूक थांबेल”– डॉ.साहेबराव निकम

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 12 जून 2024
β⇔नाशिक, दि.12 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नाशिक रोडच्या जनता विद्यालयात दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ केंद्र सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिणी जाधव , नामांकित वकील राहुल तुपलोंढे, राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. साहेबराव निकम यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सत्कार समारंभ प्रसंगी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. साहेबराव निकम यांचे ग्राहक हक्क जनजागृती विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान झाले त्यांनी असे सांगितले , की ग्राहकांचे हक्क, अधिकार व कर्तव्य ग्राहकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. तरच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबेल आणि जरी फसवणूक झालीच तर ग्राहक आयोगाकडे वेळीच तक्रार नोंदविल्यास फसवणूक झालेल्या ग्राहकांना नक्कीच न्याय मिळेल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिणी जाधव, ऍडव्होकेट राहुल तुपलोंढे, राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग, पाटील सर, प्रि.विशाखा मॅडम, प्रकाश बोराडे, राजश्री भावसार , खैरनार मॅडम, भगत मॅडम, इंगळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश बोराडे यांनी केले. तर आभार राजश्री भावसार यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)