





माळेगावात आढळले बिबट्याचे तीन बछडे

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 22 जानेवारी 2024
β⇔सिन्नर( नाशिक ), दि.22( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) :- शहराजवळील माळेगाव औद्योगिक वसाहत नजीक शेती शिवारात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्यांची तीन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तीन बछडे ते आपल्या आईपासून दुरावले आहेत. त्यांची आपल्या आई सोबत पुन्हा भेट घडवून आणण्यात सिन्नरच्या वनविभागाला यश मिळाले आहे.
माळेगाव औद्योगिक वसाहती जवळ नामदेव काकड यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू आहे. त्या दरम्यान येथे मजुरांना तीन बिबट्याचे बछडे आढळून आले होते. त्यांनी लगेच शेतमालक व स्थानिकांना कळविले. सदर माहिती स्थानिकांनी वनविभाग सिन्नर यांना दिली आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तीनही बछड्यांना एका टोपली खाली ठेवले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मादी ऊसाच्या शेतात येऊन बछड्यांचा शोध घेतला व तिने टोपली बाजूला करून यातील बछड्यांना अलगद उचलून नेले आहे.मात्र परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०