जिराफ थिएटर्सच्या ‘गुडबाय किस’ चा नाशकात रंगणार प्रयोग
β : नाशिक :⇔जिराफ थिएटर्सच्या ‘गुडबाय किस’ चा नाशकात रंगणार प्रयोग – (प्रतिनिधी :अश्विनी भालेराव)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : शुक्रवार : दि 22 डिसेंबर 2023
β⇔नाशिक : ता 22 (प्रतिनिधी :अश्विनी भालेराव) :-ठाण्यातील ‘जिराफ थिएटर्स’ या संस्थेचे नवीन प्रायोगिक नाटक ‘गुडबाय किस’ रंगभूमीवर आले आहे. येत्या गुरुवारी २८ तारखेला ‘गुडबाय किस’ नाटकाचा प्रयोग नाशिकच्या कालिदास कलामंदिरात संध्याकाळी पावणे सहा वाजता रंगणार आहे. या आधी जिराफ थिएटर्सचे ‘स्टार’ या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय या संस्थेचे सरफिऱ्या, सुंदरी, जून-जुलै, साईन्टिस्ट, रेनबोवाला आदी नाटकांनी महाराष्ट्रातील अनेक एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांमध्ये यश मिळवले आहे. ‘गुडबाय किस’ हा एक दीर्घांक आहे. या नाटकातून आपल्याला एका उत्कट प्रेमकथेतून ‘शेवटच्या भेटितल्या, शेवटच्या श्वासांची गोष्ट’ उलगडणार आहे. नात्यांचे बंध, प्रेम अधोरेखित करणाऱ्या या नाटकाचे पुणे, कल्याण, बोरिवली, माटुंगा येथे प्रयोग झाले आहेत. मुंबई, पुणे यशानंतर नाटकाचा नाशिक येथे प्रयोग होत आहे. नाटकात बॉबी आणि अक्षता टाले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. आपण सगळे निश्चितच ‘गुडबाय किस’ नाटक पाहून भरभरून दाद द्याल याची आम्हाला खात्री आहे. यासाठी मोठ्या संख्येने नाटकाला प्रतिसाद देण्यासाठी यावे असे आवाहन ‘जिराफ थिएटर्स’च्या वतीने करण्यात आले आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)