नाशिक शिक्षक परिषद निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश !
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 फेब्रुवारी 2024
β⇔ दिंडोरी, दि.9 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पंचवीस वर्षांपासून निवडश्रेणीपासुन वंचित आहे. ही बाब गंभीर असुन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक संघटनेने एक वर्षापासून निवडश्रेणी संदर्भात लढा सुरू केलेला आहे.
त्यामध्ये धरणे आंदोलने ,आमरण उपोषण तसेच मनुष्यबळ देऊन योग्य ती मदत करुन नाशिक जिल्हा भरातील एकुण २४३० प्रस्ताव प्राप्त झाले होते. पैकीयामध्ये प्राथमिक शिक्षक-सेवानिवृत्त २१८, मयत १८,कार्यरत एकुण २०४६ पदवीधर सेवानिवृत्त ३६,मयत पदवीधर शिक्षक १, पदवीधर कार्यरत २२,पदवीधर एकुण ५९ पात्र जिल्हा परिषदमध्ये एकुण कार्यरत प्राथमिक व पदवीधर एकुण शिक्षक २३४१ लोकांना लाभ दिला. मुख्याध्यापक ००, केंद्रप्रमुख ०० , कार्यरत प्रत्येक वर्षी २०% पात्र शिक्षक असे १९९५ ते २०२३ दरवर्षीचे निश्चित करुन निवड श्रेणी दिली आहे.२४३० पैकी २३४१ शिक्षक पात्र होऊन लाभ मिळाला.
नाशिक जिल्ह्यात अशक्यप्राय वाटणारी निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षक वारंवार देऊन वैतागले होते.परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी लागु करणेसंदर्भात वर्षभरापासून लढा न्यायालयीन,धरणे आंदोलन,आमरण उपोषण,प्रशासनास सहकार्य करुन सदर वेतनश्रेणी मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले.त्याचेच फलित लवकरच जिल्हा भरात निवड श्रेणी शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरी होऊन मंजूर झाली आहे अशी माहिती संजय पगार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही एकमेव संघटना निवड श्रेणी सारख्या प्रश्नावर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ने प्रश्न योग्य प्रकारे हाताळला यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.
नाशिक जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, यांचे राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांनी मानले. यामध्ये शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शालेय वेळे व्यतिरीक्त या कामास विशेष मदत केली. या आंदोलनामध्ये व इतर मदतीत संजय पगार,रमेश गोहिल,रावसाहेब जाधव, सुनिल आहिरे, विशेष सहकार्य चारुशिला भोसले(लिपिक),सखाराम सोनवणे, प्रविण कोळी,दिपक आहिरे,संजय गवळी यांनी केले . किशोर मेणे, मारुती कुंदे, वासुदेव बोरसे,राजेंद्र खैरनार, रवींद्र ह्याळिज, सुभाष बर्डे, भाऊसाहेब भदाणे, राजेंद्र पवार,सुदाम बोडके,दिपाली थोरात,अशोक पवार, अरविंद माळी,उत्कर्ष कोंडावार, शिवाजी ठाकरे,प्रभाकर नेरकर,दिपक खैरनार, प्रविण दळवी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
अभुतपूर्व आशा यशानंतर जिल्हाभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्याची चर्चा आहे. तरी सर्व तालुक्यांत शिक्षक परिषदेच्या कार्यकारिण्यांमध्ये उत्स्फूर्तपणे शिक्षक सहभागी होत आहे.
- “सर्व अधिकारी, शिक्षक परिषद पदाधिकारी,कार्यकर्ते, लिपिक यांचे आभार..निवड श्रेणी प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याने सदरील आंदोलन हे जवळपास एक ते दीड वर्ष चालले यापुढेही शिक्षकांचे गंभीर प्रश्नावर आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून प्रशासनाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी भाग पाडणार”. –संजय बबनराव पगार (राज्य सरचिटणीस/कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग)
नाशिक जिल्ह्यामध्ये संजय बबनराव पगार यांच्यासारखा अभ्यासू,प्रश्न हाताळण्याची कसोटी असणारा नेता मी जवळुन पाहिला. शिक्षकांच्या हक्कासाठी झटणारा दुसरा नेता होणे नाही कारण निवड श्रेणी प्रश्न 26 वर्षापासून सुटला नव्हता अशक्य ते शक्य केले. नाशिक जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे हे कार्य कधीही विसरू शकणार नाही. या कार्याची इतिहासात नोंद होईल.नाशिक जिल्ह्यात शिक्षकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.संजय पगार यांच्या विश्वसनीयतेची जिल्ह्याला जाण झाली. – रविंद्र जिभाऊ शिंदे
सामान्य प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौधळीचापाडा, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510