Breaking
ब्रेकिंग

स्वर्णिमा हॉलमध्ये ‘ सुनहरी यादें किशोरदा की ‘ या सदाबहार मैफिलीत .. रसिकश्रोते मंत्रमुग्ध …

स्वर्णिमा हॉलमध्ये ' सुनहरी यादें किशोरदा की ' या सदाबहार मैफिलीत .. रसिकश्रोते मंत्रमुग्ध ...

0 1 2 2 9 4

“स्वर्णिमा हॉलमध्ये सुनहरी यादें किशोरदा की ‘ या सदाबहार मैफिलीत .. रसिकश्रोते मंत्रमुग्ध “…

दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी नाशिक रोड : संजय  परमसागर 
नाशिकरोड, ता .१८दिव्य भारत बी एस एम न्यूज ): –  आनेवाला पल जानेवाला है , तुम आ गये हो नुर आ गया है , मुसाफिर हुं यारो ना घर है ना ठिकाना , ईस मोडसे जाते है , चेहरा है या चांद खिला है , हम दोनो दो प्रेमी दूनिया छोड चले , भोले हो भोले , दिवाना लेके आया है , उस दिन मुझको भूल न जाना , सलामे इश्क , सनम तेरी कसम , आपकी आँखो मे कुछ , सागर किनारे दिल ये पुकारे , दिलबर मेरे कब तक मुझे , देख के तुमको दिल डोला है ,” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाणी रम्य सायंकाळी गायकांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली . निमित्त होते ते ‘ आशा मेलोडी मेकर्स ‘ नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत ‘ सुन री यादे किशोरदा की ‘ या हिंदी कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार मैफिलीचे रविवार दि.१८ जुन २०२३ रोजी ‘ स्वर्णिमा हॉल , इंदिरानगर , नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते . या गाण्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार यांनी केले . स्वतः गायक अमरकुमार यासह संजय परमसागर , नेहा आहेर , सुनिल गांगुर्डे , गॉडविन लुईस , आशा आहेर , फारुखभाई शेख यांनी गायक किशोरकुमार यांची विविध गाजलेली हिंदी गाणी सादर केली . यावेळी यश शार्दुल या अंध विद्यार्थ्यांने ‘ चला जाता हू किसी की धून मे ‘ हे गाणे सादर करून प्रचंड टाळ्या घेतल्या . कार्यक्रमास पोलिस अधिक्षक रमेश गायकवाड , नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती पुजा पवार , माजी नगरसेवक सुनील सय्यद , इरफान मास्टर , मोनादिदी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . ध्वनी व्यवस्था कैलास काळे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केले . गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उस्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला .
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मोब. ८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 2 9 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!