सिन्नर बेपत्ता व्यावसायिक मुकुंद सारडा यांचा मृतदेह ,घाटनदेवी जंगलात सापडला
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्ववार : दि, 19 एप्रिल 2024
β⇔ सिन्नर (नाशिक), दि.19 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- सिन्नर शहरातील विजयनगर येथील रहिवासी बॅटरी व्यवसायिक मुकुंद पुरुषोत्तम सारडा (५०) यांचा मृतदेह तब्बल एक आठवड्यानंतर इगतपुरी तालुक्यातील घाटणदेवीच्या जंगलात आढळून आला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी (ता.18) दुपारी इगतपुरी पोलिसांना घाटणदेवीच्या जंगलात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याचे समजले, पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांना मुकुंद सारडा असल्याची ओळख पटली. श्री सारडा यांचा सिन्नर येथे इलेक्ट्रिक बॅटरी रिपेरिंग व विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या शुक्रवारी ते घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते, परंतु ते दुकानात पोहोचलेच नाही. तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दिली होती. आठवडाभर नातेवाईक व सिन्नर पोलीस यांचा सर्वत्र शोध घेत होते. परंतु तब्बल एक आठवड्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या संदर्भात इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आह.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510