‘समाज संघटन व ऐक्य ही काळाची गरज ‘- श्यामकांत दाभाडे
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 18 सप्टेंबर 2023
β⇒नवीन नाशिक, ता.18( प्रतिनिधी: प्रा. डॉ . कृष्णा शहाणे ) – सुवर्णकार समाजाचे संघटन होऊन ऐक्यभाव निर्माण होऊन तो वृद्धिंगत व्हावा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संत नरहरी युवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शामकांत दाभाडे यांनी केले. श्री संत नरहरी सोनार युवा फॉऊन्डेशन ग्रुपचा पदग्रहण व शाखा उद्घाटन सोहळा कै. सुमनशेठ सोनार सभागुह शहादा येथे नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जीवन जगदाळे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे, आचार्य के.बी. रणधीर, मोहन सोनार (शहादा अध्यक्ष लाड सुवर्णकार समाज), सोमेश्वर सोनार (शहादा अध्यक्ष वैश्य सुवर्णकार समाज), तुषार सोनार, मनोज घोडके, संदीप विसपुते, सौ. शैलजा रणधीर, सतीश हिंगोलीकार, नारायण आडगावकर, विजय दाभाडे, सुनीता सोनार, निलेश भामरे, सुनीता सोनार, लोटन भामरे, माधव विसपुते, मयूर अहिरराव, किशोर दाभाडे, रामचंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनार, देविदास सोनवणे, अभय वाघ, पूनम सोनार, भावना सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. संत नरहरी महाराज युवा फाउंडेशन ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष शामकांत दाभाडे पुढे म्हणाले की, आधुनिक मुंबईचे शिल्पकार आणि भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचे योगदान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे व समाज संघटन व ऐक्य हि काळाची गरज आहे. तसेच नाना शंकरशेठ पुरस्काराबद्दल मार्गदर्शन केले. सोनार समाजातील विविध पोट जातींनी एकत्र येत समाज सुधारणेसाठी कसे प्रयत्न करता येतील या बद्दल मार्गदर्शन केले. शहादा तालुका कार्यकारणी गठीत करत तालुकाध्यक्ष पदी देविदास बन्सीलाल सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. भावना नितीन वडनेरे तर शहादा शहर कार्यकारणीत शहादा शहर अध्यक्ष अभय अंबादास वाघ तर महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. पूनम लक्ष्मण सोनार यांची संस्थापक अध्यक्ष यांच्या कडून निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कोअर कमेटी अध्यक्ष म्हणून रामचंद्र हिरामण चव्हाण यांची तर जिल्हा संघटक म्हणून सोमेश्वर सोनार यांची निवड करण्या आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. प्रा. जीवन जगदाळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करतांना समाजात सुरु असलेल्या वेगवेगळ्या चळवळीचे उदाहरण देत समाजाचा प्रत्येक घटक हा समाज सुधारण्यासाठी कसे विविध प्रयत्न करत आहे व असेच युवक पुढे येऊन समाजाच्या सर्व शाखा एकत्र येऊन समाज संघटीत कसा होईल या बाबत मार्गदर्शन केले तसेच समाज ऐक्यात येणाऱ्या विविध अडचणींचे त्यांनी विश्लेषण केले. कार्यक्रमासाठी जळगाव, धुळे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला आणि नंदुरबार येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्र संचालन संघटनेचे शहादा तालुका कार्याध्यक्ष योगेश सोनार (पाडळदा) यांनी केले, प्रस्तावना शहादा शहर उपाध्यक्ष दिपक दुसाणे यांनी तर सर्व मान्यवरांचे आभार शहादा तालुकाध्यक्ष देविदास सोनवणे यांनी मानले. सर्वप्रथम माता सरस्वती, संत नरहरी महाराज व नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज रनाळकर, नितीन वडनेरे, संजय विसपुते, राजेंद्र चव्हाण, प्रकाश दाभाडे, आनंदराव विसपुते, ईश्वर चव्हाण, प्रकाश चव्हाण, मुरलीधर विसपुते, निलेश देवपूरकर, पंकज सोनार, शाम सोनार, मनोज बिरारी, योगेश अहिरराव, वैभव सोनार आदींनी परिश्रम घेतले.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)