β : नाशिक :⇔गंगापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे रामतीर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔गंगापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे रामतीर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
गंगापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे रामतीर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 30 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.30 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक शहर व जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरण हे तुडुंब भरले असून त्यातून पाणी सोडल्यामुळे रामतीर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. यावेळी पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीलगत गर्दी न करण्याचे महानगरपालिकेने व जिल्हा प्रशासनानेआव्हान केलेले आहे. नाशिक शहरात दिवसभरात 15.3 मिलिमीटर पाऊस पडला. शनिवारी 24 तासात तब्बल 49.9 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज कायम असल्याची संकेत असल्यामुळे पुराची पातळी वाढण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे रामतीर्थ परिसरातील मंदिरे आणि परिसर हा पाण्याखाली गेलेला असून दशक्रिया करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी दशक्रियाची विधी उरकावी लागत आहे.
दरम्यान पाऊस सुरूच असल्याने विसर्ज वाढण्याच्या शक्यतेने नदीकाठच्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोदाकाठवर शहरासह जिल्हा राज्य ते देशभरातून भाविक नाशिकला येत असतात, परंतु सध्या रामतीर्थ पाण्याखाली गेल्यामुळे शहर व पंचवटी परिसरातील दशक्रिया विधीसाठी आलेल्यांना मिळेल त्या ठिकाणी दशक्रिया विधी करावे लागत आहे. पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरत अनेकांनी पंचवटीतील दूतोंड्या मारुतीच्या पायऱ्याजवळ , शहराच्या बाजूने सद्गुरु ढगे महाराज समाधी, दत्त मंदिर परिसर, आधी ठिकाणी दशक्रिया करण्यास भर दिला आहे .
पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून त्यामुळे पूर वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठचे व्यावसायिक रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला असून शहराच्या सखलभागात सुद्धा पाणी शिरलेले आहे. संततधार पावसासह वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरू आहे. त्यामुळे दरम्यान कोणीही झाडाखाली थांबू नये असा इशारा देण्यात आला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )