





ताहाराबाद बीएसएनएल नेटवर्क वारंवार बंद, नियमित सेवेची मागणी
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : ताहाराबाद प्रतिनिधी : मिलिंद चित्ते
β⇒ ताहाराबाद, ता. २३ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- ताहाराबाद येथे बीएसएनएल ऑफिस अधिकार्यांना बीएसएनएलच्या नेटवर्क वारंवार बंद होत असल्याबाबत निवेदन देण्यात आले
सदर निवेदनामध्ये जानेवारी 2023 पासून नेटवर्कमध्ये वारंवार बंद होत आहे. प्रत्येक महिन्याला सटाणा आणि नामपुर या दोन्ही बाजूची केबल एकाच वेळी तुटत आहे व सेवा खंडित होत आहे. हा त्रास सर्वसामान्य जनतेला बघावा लागत आहे, त्याचबरोबर सरकारी व खाजगी बँक शाळा सरकारी दवाखाना आणि इतर ऑनलाईन कामे करणारी लोक त्याचबरोबर नोकरीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणारे या सर्व नागरिकांना याचा त्रास होत आहेत.
दर महिन्याला तीन ते चार वेळा नेटवर्क बंद असते , सदर नेटवर्क कायमस्वरूपी सुरळीत करण्यात यावे अन्यथा ऑफिस मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने व नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी निवेदन देताना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे मिलिंद चित्ते नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खैरनार माजी व्हा.चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी ताहाराबाद शरद नंदन युवा नेते राजेंद्र साळवे उत्तम घरटे सचिन जाधव, पोपट सोनवणे आदि उपस्थित होते.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले मो .८२०८१८०५१०