β : नाशिक :⇔लोकनेते:मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मितभाषी व्यक्तीमत्व,सच्चा कार्यकर्ता,निष्ठावान राजनेता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : नाशिक :⇔लोकनेते:मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मितभाषी व्यक्तीमत्व,सच्चा कार्यकर्ता,निष्ठावान राजनेता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
लोकनेते:मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मितभाषी व्यक्तीमत्व,सच्चा कार्यकर्ता,निष्ठावान राजनेता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार :दि. 25 डिसेंबर 2023
β⇔नाशिक ,ता.24 (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले ) :-भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा. हे व्यक्तिमत्व म्हणजे हरिश्चंद्र राजाचे सद्गुणी ,सदाचार , सत्य वचनी असे दुर्मिळ राजकीय व्यक्ती होय. त्याचा प्रत्यय सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आला आहे , स्वत : अपघाताने हॉस्पिटल मध्ये अविश्वास ठरावच्या वेळी मतदान करण्यास एअर अम्बुलन्सने जाण्याची वेळ आली होती. तेव्हा मतदान करण्यास गेले नसते, तरी चालले असते. मात्र भाजप पक्ष अडचणीत असतांना पक्षाला एक-एक मताची अनमोल किमत होती, चालणे देखील मुश्कील असतांना मतदान करण्यास दिल्ली जावून मतदान केले. मात्र सन २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या काही नेत्यामुळे दगा बसला आणि तिकीट नाकारून नवीन उमेदवार दिला. अशा गरीब आणि आदिवासी जनतेच्या बोगस नोकर भरती प्रश्नी न्यालयीन लढा उभारला म्हणून त्यांना तिकीट नाकारून या सच्चा दिलदार नेत्याला पक्षाकडून फटका बसला.मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे जनतेचे मित भाषी व्यक्तीमत्व,सच्चा कार्यकर्ता, निष्ठावान राजनेता यांचा जन्म २५ डिसेंबर १९५१ रोजी मुळगाव प्रतागड, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे झाला ,त्यांचे शिक्षण शिक्षण बी एस्सी (इंग्रजी) पर्यंत झालेले आहे .
-:राजकिय कारकिर्द :-
* १९६८ सरपंच प्रतागड ग्रामपंचायत (राष्ट्रीय कांग्रेस) * १९७२ नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष * १९९५ सुरगाणा पेठ मतदार संघातून अपक्ष आमदार निवडून आले ( निषाणी साईकल) * २००४ मालेगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपमधून पहिल्यांदा खासदार * २००९ मध्ये दिंडोरी भाजपमधून लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा खासदार * २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपमधून तिसऱ्यांदा खासदार * २०१९ मध्ये भाजपाने खासदारकिचे टिकीट नाकारले आदिवासी भागातील लोकप्रतिनिधीं म्हणून असतांना जाणीवपूर्वक विकासासाठी झटतांना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.देशात एकूण आदिवासींचे ५२ खासदार आहेत, त्यात महाराष्ट्रात चार आदिवासी लोकसभा मतदारसंघ आहेत.बोगस आदिवासी नोकर भरतीला विरोध करणारा एकमेव निस्वार्थी खासदार कुणावरही अन्याय , जातीभेद न करता, सर्व पक्षीय लोकांना सदैव जनसेवेसाठी काम करणारा नेता आहे. त्याच बरोबर इतर वेळी मतदार संघातील सर्व कामाचा आढावा घेवून कामे मार्गी लढवय्य नेता आहे. त्यांच्या अंगी खासदारकीचा दांडगा अनुभव असल्याने संवेदनशील रित्या रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आदिवासी वसतिगृह, ह्यावर कामे केली आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात २००० मध्ये सुरगाणा तालुक्यात दोन शाळा सुरू केल्या आहेत.यामध्ये जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ठाणगाव आणि माध्यमिक विद्यालय मनखेड अशा शाळा आहेत . अशा गरीब जनतेचे मित भाषी व्यक्तीमत्व,सच्चा कार्यकर्ता, निष्ठावान राजनेता मा. खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेबांना ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ठचिंतन उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा !
“दिव्य भारत बीएसएम न्यूजतर्फे मा खासदार हरिश्चंद्र चव्हाणयांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” !
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक: डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०