





सायखेडा विद्यालयात रंगला बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : सायखेडा प्रतीनिधी– राजेंद्र कदम
सायखेडा, ता. २८ (दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज ) : – मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कॉलेज व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने दिंडी काढून रिंगण सोहळा संपन्न झाला ” जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानराज माऊली तुकाराम ” या जयघोषात विद्यालयात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून रिंगण तयार करण्यात आले टाळ मृदुंगाच्या निनादात मुखी हरिनामाच्या गजरात बरसणाऱ्या वरून राजाच्या साक्षीने यावेळी गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे पूजन मराठा विद्या प्रसारक समाजाचे निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख व श्री भागवत बाबा बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमास उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज ,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगन कुटे, सरपंच गणेश कातकाडे, होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेश कमानकर, शालेय समिती सदस्य नितीन गावले ,राजेंद्र कुटे ,संजय शिंदे, भाऊसाहेब सुकेनकर, तानाजी हांडगे, शिवाजी भोर, यादव भोज, शेषराव माने ,ह .भ. प. नंदू बाबा डेरले शिंगवेकर, ह भ प नारायण डेरले, विद्यालयाचे प्राचार्य श्री एन. के. निकम ,पर्यवेक्षक दौलत शिंदे, अभिनव चे मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .संगीत शिक्षक ज्ञानेश्वर कर्पे , मृदुंग वादक सिद्धार्थ डेरले ,ह भ प नंदू बाबा डेरले शिंगवेकर यांच्या सुमधुर गायनाने व ह भ प शक्ती जाधव महाराज यांच्या प्रवचनाने जणू काही पंढरपूरची पंढरी सायखेड्यातच अवतरल्याचा भास होत होता. विद्यालयातील गीत मंचने विविध भजने सादर करून त्यात उत्साह निर्माण केला . सायखेडा येथील साद नाद ढोल पथक व विद्यार्थ्यांची विविधरंगी वेशभूषा या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते . यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रिंगण सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक ,पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणप्रेमी उपस्थित होते .