





येडशी येथे “लातूर – बार्शी” राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजल्याने प्रवाशी व नागरिकात समाधान
β : येडशी(धाराशिव) :⇔ येडशी येथे “लातूर – बार्शी” राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजल्याने प्रवाशी व नागरिकात समाधान
( प्रतिनिधी : सुभान शेख )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 3जुलै 2024
β⇔येडशी(धाराशिव), ता.3 ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग “लातूर – बार्शी” वरील मागील अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. “लातुर – बार्शी ” राज्य महामार्गावर पुणे – लातूर , नाशिक – लातूर, छत्रपती संभाजीनगर-लातूर अनेक लक्झरी बस, प्रवाशी वाहने रात्रभर ये- जा करतात. दिवसभरातुन लातुर – पुणे असलेले बसेस, दोन चाकी, तीन चाकी, ट्रक असे अनेक वहाने ये – जा करत असतात. त्यामुळे हा महामार्ग सतत वर्दळीचा असल्याने खडयाचे साम्राजे पसरले होते.
दरम्यान “लातुर – बार्शी” महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक वाहन धारकांच्या जिवेला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही अवस्था पाहून नागरिकांच्या भावना ओळखून ‘यु ट्युब चॅनलचे’ येडशी प्रतिनिधी – सुभान शेख यांनी तात्काळ दखल घेऊन लातुरचे राष्ट्रीय राज्य महामार्गाचे कोरे यांना फोन वरून माहिती दिली. त्यांनी येडशी मधील ‘ लातुर – बार्शी ‘ राष्ट्रीय राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डेमुळे अनेक वाहन धारकांच्या जिवेला धोका आहे. सदर खड्डे तात्काळ बुजण्यात यावेत,अशी माहिती दिली. सदर माहितीची दखल घेत राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुर – बार्शीचे प्रमुख कोरे यांनी तात्काळ दखल घेतली आणि दोन दिवसांपासून खड्डे बुजविण्यास सुरवात करण्यात आली आहे.
महामार्ग सतत वर्दळीचा असल्याने खडयाचे साम्राजे पसरले होते. मात्र आज दि.30 जुन रोजी खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्यानंतर खड्डे मोठमोठे दगड- खडी, कचखडी डाबंर असे खड्डयात टाकून डांबरीकरण करण्यात आले. खड्डे बुजविण्यामुळे सर्व वाहन धारकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. खड्डे बुजविण्यामुळे यु ट्युब चॅनल – दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलचे संपादक – डॉ. भागवत महाले, येडशी प्रतिनिधी – सुभान शेख आणि राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुरचे – कोरे यांच्या प्रयत्नाने यश आल्याने या सर्वांचे वाहनधारक ग्रामस्थांनातुन आभार मानले जात आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)