Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिक :⇒ “ज्ञानाची व्याप्ती आणि खोली ही गुरु- शिष्य संवादातून अधिक उलगडत जाते “- प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे – ( प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी )

β : नाशिक :⇒ "ज्ञानाची व्याप्ती आणि खोली ही गुरु- शिष्य संवादातून अधिक उलगडत जाते "- प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे - ( प्रतिनिधी : छाया लोखंडे - गिरी )

018491

महिला महाविद्यालयात शिक्षक दिन ‘ उत्साहात संपन्न  !

“ज्ञानाची व्याप्ती आणि खोली ही गुरु- शिष्य संवादातून अधिक उलगडत जाते “- प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे 

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  :  नाशिक : बुधवार : दि १3 सप्टेंबर २०२३ 

β⇒ नाशिक , ता . १३  ( प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी ) :-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के . महिला महाविद्यालयात आज ‘शिक्षक दिन’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.  ह्या प्रसंगी संस्थेचे भूतपूर्व सचिव व महासंचालक दिवंगत सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांच्या शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या व्याख्यानाची ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. त्यांनी राधाकृष्णन ह्यांच्या चारित्र्याची , कर्तृत्वाची महती स्पष्ट केली. ज्ञानाधिष्ठित समाज तयार करणे, हे आपले कर्तव्य आहे , ज्ञानाची व्याप्ती आणि खोली ही गुरु- शिष्य संवादातून अधिक उलगडत जाते असे त्यांनी सांगितले . 

                              या प्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छोट्या नाटिकेतून , आपल्या मनोगतातून , काव्य वाचनातून विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या सचिव व खजीनदार – महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या  मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. सौ. कविता पाटील , उपप्राचार्या डॉ. सौ नीलम बोकिल , समन्वयक प्रा. डॉ. नितीन सोनगिरकर , सौ. शोभा त्रिभुवन , सौ. मैथिली लाखे सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!