के.व्ही. एन.नाईक महाविद्यालय भूगोल विभागान्तर्गत भौगोलिक मॉडेल मेकिंग स्पर्धा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 फेब्रुवारी 2024
β⇔ मोहाडी , दि.19 (प्रतिनिधी : राजवर्धन निकम ):- क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल विभागात अंतर्गत प्राचार्य डॉ.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली भौगोलिक मॉडेल मेकिंग कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले होते व त्याचे सादरीकरण भूगोल विभागात प्रदर्शनाच्या माध्यमातून केले.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भोसला मिलिटरी कॉलेज येथील भूगोल विभाग प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल अभ्यास मंडळ सदस्य डॉ.विलास उगले व बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील उपप्राचार्य , भूगोल विभाग प्रमुख डॉ. अनिलकुमार पठारे हे होते.भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील मजकुरावर आधारित विविध मॉडेल तयार केले. त्यावेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ही स्पर्धा विद्यार्थ्यांना भूगोलातील विविध संकल्पना समजून घेण्यास आणि सर्जनशीलता,नाविन्य आणि संशोधन क्षमता विकसित करण्यास मदत करेल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. पौर्णिमा बोडके,उपप्राचार्य प्रा.दिलीप कुटे,डॉ.शरद काकड,विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब चकोर,आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ.राजेंद्र झोळेकर, डॉ.स्नेहल कासार,डॉ.आशाली खारके,प्रा.तेजल सावळे,प्रा.दिग्विजय गायकवाड आदी उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर प्रदर्शन दोन दिवस सकाळी ८ ते १२ या वेळेस सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.उपक्रम यशस्वी करण्यासाठी भूगोल विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी विशेष असे परिश्रम घेतले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510