





नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत नाशिकला केवळ चर्चेचे गुराळ

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 9 जून 2024
β⇔नाशिक, दि.9 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):-नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची घोषणा ही लोकसभा निवडणुकीतील ” जुमला” ठरण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वे मंत्रालयात दोन वर्षापासून कुठलाही पाठपुरावा झालेला नसल्याने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिक- पुणे मार्गात बदल करून नाशिक- शिर्डी – पुणे केल्याबद्दलचा साधा प्रस्तावही दाखल झालेला नसल्यामुळे दोन वर्षात या रेल्वे मार्गाची फाईल कोणत्याही चर्चेविना केंद्रीय रेल्वे मंत्रालयात अक्षरशः धूळ खात पडलेली खासदार वाजे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या संदर्भात मंगळवारी तारीख 9 रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत सविस्तर माहिती जाणून घेतली. नाशिक- पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग 2021 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला होता, महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून तो उभारला जाईल या मार्गासाठी साधारण 16000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यातील प्रत्येकी 10 टक्के खर्च राज्य व केंद्र सरकार करणार असून उर्वरित खर्च कर्ज उभारून केला जाणार आहे .त्यानुसार महा रेल कंपनीने भूसंपादन विभागाच्या मदतीने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पासाठी 45 हेक्टर भूसंपादन पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. मात्र रेल्वे मार्ग व्यवहार करण्यासाठी तसेच डोंगर भागातील बोगद्याचा खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकार तर्फे हा मार्ग शिर्डी मार्गे वळविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रेल्वे मार्ग बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयामुळे यापूर्वी संपादित केलेल्या जागेचे राराचे काय असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर उभा राहिला होता.
महा रेल्वे नाशिक व सिन्नर तालुक्यातील बावीस गावांमधील सुमारे 287 हेक्टर जमीन खरेदी करणे प्रस्तावित केले होते. त्यासाठी 250 कोटीच्या निधी पैकी जिल्हा प्रशासनाने 100 कोटी ची मागणी नोंदविली आहे त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा वाढली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिनांक 8 मंत्रालयात या संदर्भात बैठक आयोजित केली होती. खासदार वाजे यांनाही या बैठकीला निमंत्रण केलेले होते. परंतु पावसामुळे ही बैठक रद्द झाली त्यामुळे खासदारांना अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले .आता बुधवारी 10 ही बैठक होणार असल्याचे समजते परंतु केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे याविषयी माहिती जाणून घेतली असता नाशिक पुणे रेल्वे मार्गा विषयी दोन वर्षात एकही पाऊल पुढे पडलेले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात गड्ड्यात तळाला पडला आहे .त्यावरील धूळ झटकण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू असल्याचे खासदार वाजे यांनी सांगितले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)