0
1
5
5
3
7
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर(नाशिक), दि.06 (प्रतिनिधी ):- मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. सतीश श्रीवास्तव यांच्या हस्ते अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. सतीश श्रीवास्तव म्हणाले, की “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवकासंमोरील आव्हाने ”या बाबत चर्चा करून सध्याच्या युगात तरुणांनी नोकरीकडे न वळता स्वयंरोजगार आपल्या कौशल्याच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे,’ असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. ते पुढे म्हणले की युवकांनी स्वयंरोजगाराच्या संधी स्वतः निर्माण करून त्या यशस्वी पणे आपल्या व्यवसायात व उद्योगात यशस्वी झाले पाहिजे, हे पटवून देतांना माधुरी खांडव, रेखा चौधरी, कैलास काटकर, रितेश अग्रवाल यांच्या यशस्वीतेची गाथा विद्यार्थ्यासमोर मांडली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले, की विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आणि भाषा, कामावर निष्ठा आणि कष्ट करण्याची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास, तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्रास्ताविक करतांना अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुलक्षणा कोळी यांनी अर्थशास्त्र मंडळामार्फत वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सदर कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. शरद कांबळे, सकाळसत्र प्रमुख डॉ. राजेश झणकर, डॉ. दिलीप भेरे, प्रा. विष्णू दिघे, प्रा. पारखे, प्रा. उत्तम सांगळे, प्राध्यापक, प्रध्यापाकेत्तर कर्मचारी व विद्यार्धी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. दिलीप भेरे व आभार प्रदर्शन प्रा. विष्णू दिघे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )