





शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सलाउददीन शेख तर उपाध्यक्षपदी, जावेदपाशा पटेल यांची निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 31 जून 2024
β⇔येडशी (धाराशिव) दि.31 ( प्रतिनिधी : सुभान शेख):- येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बुधवारी (दि . ३१ ) स्थापना करण्यात आली. यामध्ये सलाउददीन बाबु शेख यांची अध्यक्षपदी तर व उपाध्यक्षपदी जावेदपाशा शमशोददीन पटेल यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची उर्वरीत समिती सदस्य नजीरपाशा लतीफ शेख , अजमुद्दीन रफिक शिकलकर , महिला सदस्य श्रीमती समीरा इम्रान शेख ,आमीना शकील शेख ,समीना बाबू शेख ,सुमय्या बिलाल बागवान ,काजल इलियास सय्यद, खदिराखानम मुन्वरखान पठाण आदीची सर्वांनुमते निवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यासह उपस्थितांचे आभार मानून स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका यास्मिन शेख , शिक्षक मिर्झा असिफ बेग , शिक्षिका शबाना शेख , पालक अजीम शेख आदिंसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510