





“हे सामाजिक काम तुमच्यासाठीच, मला तर निवडणूकीत उभे रहायचे नाही. सगळ्या गोष्टी सरकारच करेल या भरोसावर राहू नका”- अभिनेता नाना पाटेकर
अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते सुरगाणा तालुक्यात म्हैसखडक येथील पाझर तलाव खोलीकरण लोकार्पण संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 6 मार्च 2024
β⇔सुरगाणा(शहर),दि.6(प्रतिनिधी:रतन चौधरी):-“हे सामाजिक काम तुमच्यासाठीच आहे. मला तर निवडणुकीत उभे रहायचे नाही. सगळ्या गोष्टी सरकार करेल या भरोसावर राहू नका,”असे प्रतिपादन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी म्हैसखडक येथील पाझर तलाव खोलीकरण लोकार्पण प्रसंगी केले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, धनाजी पुरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, गावातून नोकरी, व्यवसाय, धंदा निमित्ताने बाहेरगावी जाऊन पैसा कमविणा-या लोकांनी कुठे तरी काही तरी गावासाठी ठेवा.मुस्लिम बांधवांच्या कुराणात जकात नावाचा प्रकार आहे, की इतके पैसे समाजासाठी दिले पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्वच धर्मात सांगितले आहे.शंभर रुपये कमविले तर पाच रुपये गावासाठी दिले पाहिजेत.तो फंड बाजूला काढून ठेवावा. कारण तुमचा पिंड पोहोचला आहे. या गावाच्या मातीत एपीरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्थसाह्याने, शेतकरी सहभागातून आणि एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत सुरगाणा तालुक्यातील मौजे झुंडीपाडा, म्हैसखडक येथील पाझर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
तालुक्यात चार ठिकाणी पाझर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरणाचे आणि बांध दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मौजे म्हैसखडक येथील झुंडीपाडा च्या तलावाचे लोकार्पण नाम फौंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर तसेच एपीरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सी. एस. आर फंडाचे प्रमुख धनाजी पुरी, आमदार नरहरी झिरवाळ, यांच्या हस्ते झाले आहे. या तलावामुळे झुंडीपाडा येथील पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे शेती सिंचन पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.या पाझर तलावाची साठवण क्षमता सहा कोटी लिटर झाली असून यामधून अंदाजे साडेबारा हजार टँकर पाणी साठवून राहणार आहे.
या तलावातून पंधरा हजार ट्रॅक्टराच्या खेपांची वाहतूक करुन गाळ बाहेर काढून तो शेतात पसरवला आहे.एपीरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने सुरगाणा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आपल्या सीएसआर निधीतून उपलब्ध करून दिला आहे. यामुळेसुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.म्हैसखडक येथील ग्रामस्थ व सर्व समाजाने एपीरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार व्यक्त केले. या कामासाठी जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी,अभियंता यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
यावेळी स्वदेस फाउंडेशनने चे दिपक गिऱ्हे, राजेंद्र गुंड, सत्यवान काळे, विलास पावरा, नितिन डोंगरदिवे, तुकाराम बोरसे, सौ. कल्पना महाले, म्हैसखडक ग्राम पंचायत सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्राम विकास समिती दोडीपाडा(झुंडीपाडा) अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सदस्य, स्वदेस मित्र, म्हैसखडक दोडीपाडा गावातील सर्व महीला, पुरुष, तरुण, गांवकरी उपस्थिती होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510