





गोखले फार्मसी महाविद्यालयात‘ रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताह‘ उत्साहात साजरा
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: गुरुवार, 17 ऑगस्ट 2023
β⇒नाशिक ,17 ( प्रतिनिधी : दिपाली भंडारी ):- कॉलेज रोड नाशिक – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध अधिनियम १९९९ लागू केला आहे.भविष्यात रॅगिंगच्या घटना घडू नयेत याकरिता व्यापक स्वरूपात काटेकोरपणे प्रयत्न करणेबाबत शासनाने सूचित केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने रॅगिंग प्रतिबंध संदर्भात जनजागृती करण्यासाठी दि.१२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान ‘रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यास सांगितले आहे . त्याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-विद्यार्थी कल्याण मंडळ व गोखले एजुकेशन सोसायटी संचालित सर डॉ. मो.स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रॅगिंग बाबत जनजागृतीपर निबंध व भित्तीपत्रिका सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात एकूण २० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अशा कृत्यामुळे पीडितेवर येणारी संदिग्धता आणि नैराश्य तसेच रॅगिंगचे असे घृणास्पद कृत्य केल्याबद्दल दोषी व्यक्तीला भोगावे लागणारे परिणाम यांचे प्रदर्शन केले.विद्यार्थ्यांनी भविष्यात अशा कुठल्याच कृत्यात गुंतणार नाही आणि अशी कोणतीही घटना पाहिल्यास किंवा आढळल्यास तक्रार करण्याचे वचन दिले.सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ.सुनील अमृतकार, उपप्राचार्य डॉ.प्रशांत पिंगळे ,प्रा.डॉ.प्रमोद कातकाडे ,विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी श्री. साहेबराव बोरस्ते यांचे सखोल मार्गदर्शन लाभले .अँटी -रॅगिंग प्रतिनिधी प्रा.श्री.संदीप पुरकर ,सौ.अश्विनी शेळके यांनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता खूप परिश्रम घेतले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
