Breaking
ब्रेकिंग

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रक्तदान शिबीर संपन्न – (प्रतिनिधी : संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रक्तदान शिबीर संपन्न - (प्रतिनिधी : संजय परमसागर )

0 1 0 5 4 3

बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रक्तदान शिबीर संपन्न 

β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज व्र्यत्त्सेवा : नाशिक : सोमवार : दि ९ ऑक्टोबर २०२३ 

 

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रक्तदान शिबीर संपन्न - (प्रतिनिधी : संजय परमसागर )
pβ : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रक्तदान शिबीर संपन्न – (प्रतिनिधी : संजय परमसागर )

नाशिकरोड,  ता ९   (प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एन. सी. कला, जे. डी. बी. वाणिज्य आणि एन. एस. सी. विज्ञान महाविद्यालय, नाशिक रोड, नाशिक च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच एनसीसी , एअर विंग व आर्मी विंग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘आदरणीय स्व. सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता . सदर शिबिरात एकूण ४३रक्त पिशवी संकलित करण्यात आल्या . शिबिराचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी केले .यावेळी ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ.विनायक गोविलकर , संस्थेचे नाशिक विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी , ब्रांच सेक्रेटरी डॉ. व्हि.एन.सूर्यवंशी , डॉ.आर.पी.देशपांडे , श्री.शैलेश गोसावी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले . शिबिरासाठी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य व एअर विंग कमांडर डॉ. आकाश ठाकुर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कांचन नवले , एनसीसी आर्मी विंग लेफ्टनंट डॉ.विजय सुकटे , प्रो.डॉ.सूरेश कानडे , विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ.के.सी.टकले ,कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष , प्रा. लक्ष्मण शेंडगे , प्रा. वासिम बेग , प्रा. नरेश पाटील , डॉ. सुधाकर बोरसे , डॉ. अनिल सावळे , जयंत भाभे , संजय परमसागर यांसह एनएसएस. स्वयंसेवक , एनसीसी , एअर विंग आणि आर्मी विंग स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच कमवा आणि शिका योजना विभागाचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले .

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो :८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 5 4 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!