सुरगाणा तालुक्यात लक्ष घालून शिक्षक परिषद सर्वांचे कामे व न्याय हितासाठी अविरत कार्यरत राहणार : संजय पगार ( म.रा.शि.प.राज्य कार्यवाह)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 12 मार्च 2024
β⇔सुरगाणा, दि.12 (प्रतिनिधी :रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सुरगाणा तालुका मेळावा चौधरी फार्म हाऊसवर मालगव्हाण (सुरगाणा ) येथे राज्य कार्यवाह /सरचिटणीस संजय पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या मेळाव्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष दिपक खैरनार,दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी श्रीम. भगवती चौधरी(काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष), जिल्हा उपाध्यक्ष दिपक खैरनार, रावसाहेब जाधव, उपाध्यक्ष अरविंद माळी(नाशिक पतसंस्था संचालक), सहकार्यवाह पुंडलिक शिंगाडे,शरद केदारे उपस्थित होते.
राज्य कार्यवाह संजय पगार यांनी शिक्षक परिषदेने आजपर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन,दिव्यांग न्याय लढा निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते, शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो. यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.परिषदेच्या आजच्या मेळाव्यात आपण भरभरून साथ दिली. तुमच्या सर्वांच्या न्याय हितासाठी शिक्षक परिषद अविरत कार्यरत राहील, सुरगाणा तालुक्यात लक्ष घालून कामे मार्गी लावले जातील. असे पगार यांनी सांगितले.
सुरगाणा तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आली. तालुका नेते विनायक चौधरी,तालुकाध्यक्ष- मुरलीधर गवळी, सरचिटणीस/कार्यवाह-हरी भोये , कार्याध्यक्ष -परशराम गांगुर्डे, सुनिल सोनवणे,कोषाध्यक्ष -रमेश खोटरे ,नाना धुम,कार्यालयीन मंत्री -संजय पवार, सहकार्यवाह-रामचंद्र महाले,हिरामण गावित, पांडुरंग राऊत,लक्ष्मण चौधरी , संघटन मंत्री -खुशाल राऊत , उपाध्यक्ष -परशराम गांगुर्डे,शेखर वाघ , युवराज गवळी, रमेश काकुळते,जयराम जाधव, सल्लागार -रमेश गायकवाड,वसंत जगताप, प्रसिद्धी प्रमुख -कांतीलाल भोये, चिंतामण चौधरी, तालुका प्रतिनिधी-काशिनाथ देशमुख, प्रकाश गवळी महिला आघाडी रत्ना कदम,छाया गवळी , सेवानिवृत्त प्रतिनिधी जयवंत देशमुख यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशराम गांगुर्डे यांनी तर आभार विनायक चौधरी यांनी मानले.
“श्रीमान संजय बबनराव पगार यांच्यासारख्या अभ्यासून नेतृत्वामुळे शिक्षकांना न्याय मिळत आहे, सुरगाणा येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे शिक्षक परिषदेसोबत आहेत व यापुढेही राहणार शिक्षक बांधवांनो सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षक नेत्याला साथ देणार”– विनायक ऊखाराम चौधरी, (तालुका नेते ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सुरगाणा.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510