β : नाशिक :⇒ संदीप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा ! ( प्रतिनिधी – कमलेश दंडगव्हाळ )
β : नाशिक :⇒ संदीप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा ! ( प्रतिनिधी - कमलेश दंडगव्हाळ )
संदीप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा !
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि ०५ सप्टेंबर २०२३
β : :⇒ नाशिक (महिरावनी ) ( प्रतिनिधी – कमलेश दंडगव्हाळ ) : – येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. कार्यक्रमाची सुरवात दीप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. महाविद्यालयाचे विद्यार्थी भावेश पाटील सिद्धी निगल, सुजाता लोंढे, गजानन हिरे, निकिता पाटील, विनय क्षीरसागर, सतीश कलंत्री यांनी शिक्षकाची भूमिका पार पडली. द्वितीय वर्ष डी. फार्म. विद्यार्थिनी अनुजा थापे हिने गणेश वंदना सादर केली.
त्यानंतर प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे यांनी सांगितले कि, डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असण्यासोबतच एक महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न प्राप्त करणारे होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे शिक्षक म्हणून देशासाठी वाहून घेतली. शिक्षकांचा आदर करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. समाजाला योग्य दिशा देण्यात खरा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो. खरा गुरू आपल्या शिष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचे योगदान देतो. विद्यार्थांनी आपल्या मनोगतात शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
द्वितीय वर्ष बी. फार्म. ची विद्यार्थिनी नुपूर माळी व तृतीय वर्षातील मानसी पाटील ह्यांनी नृत्य सादर केले. तृतीय वर्षातील प्रतीक्षा बाविस्कर हिने गाणे सादर केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल खैरनार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनाकरिता प्रा. अमित गायकवाड, प्रा. सौ. शिवानी पाटील, विद्यार्थी साहिल खैरनार, सोहंम पुरोहित तसेच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०