β : त्र्यंबकेश्वर (नाशिक) :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “विज्ञान मंडळ उद्घाटन”आणि “पहिल्या राष्ट्रीय अंतरीक्ष दिवस”उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : आशुतोष खाडे )
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक) :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात "विज्ञान मंडळ उद्घाटन"आणि "पहिल्या राष्ट्रीय अंतरीक्ष दिवस" उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : आशुतोष खाडे )
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “विज्ञान मंडळ उद्घाटन” आणि “पहिल्या राष्ट्रीय अंतरीक्ष दिवस” उत्साहात साजरा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 24 ऑगस्ट 2024
β⇔त्र्यंबकेश्वर, दि. 24 (प्रतिनिधी : आशुतोष खाडे ):- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे विज्ञान विभागातर्फे “विज्ञान मंडळ उद्घाटन” आणि “पहिल्या राष्ट्रीय अंतरीक्ष दिवस” साजरा करण्यात आला. विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. दिनकर पाटील यांचे ‘भारतीय अंतरीक्ष विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे होते. यानिमित्ताने महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
प्रसंगी प्रमुख्य वक्ते म्हणून बोलतांना डॉ. दिनकर पाटील म्हणाले, की ‘संशोधन ही दिर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, आणि विज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास करून तुम्ही सुद्धा इस्रो मध्ये कसे जाऊ शकता, याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, की “विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जागृत ठेवली पाहिजे आणि प्राध्यापकाचे अनुकरण करून पुढे जावे व आपल्या महाविदयालयाचे नाव मोठे करावे,असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमात विज्ञान विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद उगले, सूत्रसंचालन प्रा. राजश्री शिंदे व आभार प्रा. योगिनी पगारे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )