





“जलजीवन मिशन योजना “अंमलबजावणीत नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 29 मे 2024
β⇔नाशिक,दि.29 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-“जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत “जलजीवन मिशन योजना” अंमलबजावणीत नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.15 एप्रिल 2024 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या 1,222 योजना पैकी 613 योजना पूर्ण केल्या आहे.राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने नुकतेच जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनाचा आढावा घेतला असता त्यात ही बाब समोर आली आहे. मार्च 2024 पर्यंत प्रत्येक घरांना नळाचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे ध्येय केंद्र सरकारने समोर ठेवून जलजीवन मिशन योजनेची घोषणा केली होती. अंमलबजावणी होत असलेल्या या योजनेतून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 26, 784 कोटी रुपयाच्या केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून 33 हजार 818 योजनांना मंजुरी दिली आहे.
मार्च 2024 पर्यंत ह्या सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या 1,222 योजनांचा समावेश आहे, परंतु विभागाअंतर्गत असलेल्या विविध अडचणीमुळे कार्य आरंभाचे आदेश दिल्यावरही प्रत्यक्ष या कामांमध्ये विलंब झाला.त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनाची कामे संथ गतीने सुरू आहेत. सरकारने ही मुदत 31 मार्च 2024 पर्यंत ठरवून दिली होती, त्यात सरासरी 25% योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या. राज्यातील 35 हजार 8 18 योजना पैकी साधारण साडेआठ हजार योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचे आढावा बैठकीत निदर्शनास आले, 31 मार्च 2024 पर्यंत योजना पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच सरकारने या योजनांना आता सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )