





वृक्षारोपण व पर्यावरण संगोपन काळाची गरज– प्रदीप कदम

β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा” : नाशिक : रविवार : दि.17 डिसेंबर 2023
β⇔पुणे, ता.16 ( प्रतिनिधी : विपुल धसाडे) :- केंद्रीय कृषिमंत्री पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य माननीय प्रदीप कदम, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्रआबा पठारे, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सध्याच्या काळात प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी वृक्षारोपण करण्याची खूप गरज आहे. वृक्षारोपणाबरोबरच, पर्यावरणरक्षण व संगोपन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य प्रदीप कदम यांनी व्यक्त केले. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचे संस्कार विद्यार्थ्यांच्यावर घडवणे अतिशय स्तुत्य आहे. असे मत यावेळी महेंद्र आबा पठारे यांनी व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या युवा पिढीने वृक्षारोपणाचे महत्त्व समजून घेऊन पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संगोपण व जनजागृती करण्यासाठी असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सातत्याने आयोजित करण्यात येतात, असे मत व्यक्त करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी केले. यावेळी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन कोतवाल, उपप्राचार्या डॉ विजया बर्गे, डॉ रवींद्र पाटील आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविका विभाग प्रमुख डॉ.सुजित काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार व संपूर्ण नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण घुले, प्रा नितीन नेहरकर, प्रा शुभांगी कारखिले यांनी केले.
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०