संदीप फाऊंडेशन संचालित फार्मसी महाविद्यालयात भारतीय अवयवदान दिन उत्साहात…
β ⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : महिरावनी प्रतिनिधी : कल्पेश दंडगव्हाळ
β ⇒ महिरावनी (नाशिक ), ता. ८ ( दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृत्तसेवा ) :- महिरावनी येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात ३ ऑगस्ट रोजी भारतीय अवयवदान दिन उत्साहात संपन्न झाला. अवयवदान महत्त्वाचे का आहे, या बद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) तर्फे ०३ ऑगस्ट रोजी भारतीय अवयवदान दिन (Indian Organ Donation Day) साजरा केला जातो. याप्रसंगी क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राचे सदस्य (ZTCC) व मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदाना विषयीचे प्रमुख गैरसमज दूर केले. अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे, पण अजूनही या दिशेने बरेच काम करायचे आहे. आपल्या देशात अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते, ज्या अंतर्गत अवयवांची खरेदी आणि विक्री प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार रुग्णाचे जवळचे नातेवाईकच अवयवदान करू शकतात. मानवी अवयवांच्या खरेदी-विक्रीला सक्तमनाई आहे आणि तसे करणे दंडनीय गुन्हा आहे. असे त्यांनी नमूद केले.
डॉ. संजय रकिबे यांनी ZTCC विषयी माहिती देताना सांगितले, हे अवयव दान आणि अवयव वाटपाच्या स्वाधीन केलेल्या आरोग्य सेवेचा एक अनोखा पैलू दर्शवते. ही एक ना-नफा संस्था आहे. जी भारत सरकारने मृत दातांच्या अवयवांची यादी आणि वाटपाची योग्य व्यवस्था ठेवण्यासाठी नियुक्त केली आहे. ZTCC पुणे देणगीदार रुग्णालये आणि प्रत्यारोपण केंद्रांशी जवळून काम करते. अवयव दानाबद्दल जागरुकता वाढवणे, मृत दात्यांना ओळखणे, अधिकृत करणे, अवयवांचे वाटप करणे, गुळगुळीत अवयव पुनर्प्राप्ती प्रणाली तयार करणे आणि प्रत्यारोपण न झालेल्या अवयवांच्या पुनर्प्राप्तीला प्रोत्साहन देणारी एक सर्वात यशस्वी संस्था म्हणून विकसित झाली आहे. हे सांगताना त्यांनी ग्रीन कॉरिडॉर बद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मार्फत आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावना केली. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत चिखले व प्रा. डॉ. सारिका कांबळे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले व आभार व्यक्त केले.
β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ,mo. 8208180510