





येडशी येथे विद्युत समस्याने नागरिक त्रस्त; वारंवार तक्रार करून ही वीज गायब,प्रशासन सुस्त ! सक्तीने विजबिले वसुली,ग्रामस्थांचा आक्रोश

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 24 जून 2024
β⇔,येडशी (धाराशिव) दि.24 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय महामार्ग “लातूर-बार्शी” रोडलगत असलेल्या 9 नंबर डीपीवरून अंगणवाडी डीपी या डीपीवर वेगळे कनेक्शन देऊन देशमुख गल्ली, नलावडे गल्ली, बलवंड गल्ली अशा अनेक गल्ल्यांमध्ये विद्युत कनेक्शन दिले आहे. काही नागरिकांचे विज कनेक्शन अंगणवाडी डीपीवरून दिलेले आहेत. येडशी येथील महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता चव्हाण आणि सहाय्यक उपअभियंता स्वामी कार्यरत आहेत. परंतु, येथील अंगणवाडी डीपी पूर्णपणे खराब झाले असून, महावितरणचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारी वरून दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलचे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी माहिती देण्यासाठी महावितरणचे सहाय्यक उपअभियंता स्वामी यांना फोन केला असता, त्यांचा फोन बंद असतो किंवा ते फोन उचलत नाहीत. कधी फोन लागला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,